क्राइम
दुकानात गेलेल्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग…
पोस्को गुन्हा अंतर्गत आरोपीला अटक
तुमसर सिहोरा (पोलीस) वार्ता:-पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ला मिळालेल्या माहितीनुसार तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे अल्पवयीन मुलीगी वय 11वर्षे आपल्या मैत्रींनीसोबत चौकात चॉकलेट घेण्याकरिता किराणा दुकानात घेली असता दुकानदार देवेन्द्र बिसने वय 55 वर्षे यांनी पिडीत अल्पवयीन मुलीला हात पकडून अश्लिल हरकत करु लागला. पिडीत मुलगी तिथून घाबरून घराकडे पळ काढून घरातील आई व नातेवाईकाला घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती सांगितली.
पिडीत मुलगी व तिच्या आईने सिहोरा पोलीस ठाण्यात जाऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली.
सिहोरा पोलीस स्टेशन चे ठाणेदार विजय कशोधन व त्यांचे सहकर्मी तिलक चौधरी यांनी आरोपी विरुद्ध अप. क्र. 101 /2025 कलम 74,75 (1) भादवी सह कलम 8पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपी ला अटक करण्यात आली.




