अखेर वाघाला वनकर्मिंनी केले जेरबंद…
एक आठवड्या पासुन चांदमारा, कुरमुडा शेत शिवारात वस्तीजवळ वास्तव्य वाघाला
वन विभाग भंडारा जिल्हा वार्ता :-वनपरिक्षेत्र नाकाडोंगरी अंतर्गत येत असलेल्या डोंगरी, कुरमुडा, चांदमारा ह्या भागात वन्यप्राणी वाघ एक आठवड्या पासुन गावातील पशुधनावर हमला करुन आपली भुक भागवत होता. ह्या परिसरात भितीचे वातावरण पसरले ले कित्येक शेतकरी आपल्या शेतावर जाण्याचे टाळत होते. भंडारा वनविभाग, बचाव दल नवेगाव नागझिरा, व्याघ्र प्रकल्प आणि वनपरिक्षेत्र नाकाडोंगरी वन कर्मचाऱ्यांच्या पथकाने उपवनसंरक्षक राहुल गवई, सहा. उपवनसंरक्षक रितेश भोंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वाघाला बेशुद्ध करून जेर बंद करण्यात आले. ह्या वाघाची वैद्यकीय व शारीरिक तपासणी करुन नैसर्गिक अधिवासात सुरक्षित निसर्ग मुक्त करण्यात आले.
ह्या सर्व वाघाला जेरबंद प्रक्रिया पर्यत वनसंरक्षक समिती साकोली यांच्या मार्गदर्शनात

कु. अपेक्षा शेंडे वनपरिक्षेत्र अधिकारी नाकाडोंगरी
शिघ्र बचाव दल, तुमसर, लेंडेझरी वन परिक्षेत्र अधिकारी व वनकर्मिंनी यशस्वीरीत्या पार पाडली.
वाघाच्या दहशतीमुळे नागरिकांमध्ये तसेच परिसरात कोणतीही अप्रतिम घटना घडू नये आणि वनविभागाच्या कामात अडथळा निर्माण होऊ नये यासाठी गोबरवाही पोलीस स्टेशन चे
मा.ठानेदार शरद शेवाळे
व त्यांचे सहकर्मी पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी सकाळपासून तैनात होते.



