निष्कृष्ठ बांधकाम केलेल्या रस्त्याची चौकशी करुन दुरुस्ती करावी -आनंद मलेवार आरोग्य व अर्थ सभापती

अन्यथा रास्ता रोको आंदोलन
भंडारा जिल्हा वार्ता:- पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क लामिळालेल्या माहितीनुसार वरठी-एकलारी -नेरी या रस्त्याच्या बांधकामाला प्रधानमंत्री ग्राम सडक योजना अंतर्गत रस्त्याचा बांधकाम 2020-21 मध्ये पुर्ण करण्यात आला ह्या प्रधानमंत्री ग्रामसडक योजना अंतर्गत करारनामे अटीनुसार बांधकाम पूर्ण झाले पासुन पुढील पाच वर्षे पर्यंत देखभाल दुरुस्ती संबंधित विभागाकडे असते परंतु त्या विभागाने बांधकाम पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे पर्यवेक्षण नसल्याने संपूर्ण रस्ता खड्डामय झालेला आहे आणि अपघाताची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे.
काही महिन्यांपूर्वी रस्त्याच्या कडेला दोन ते चार ठिकाणी बदरी गिट्टी पाडण्यात आली परंतु आतापर्यंत रस्त्याचे काम सुरु झाले नाही.

मा. सभापती मलेवार यांनी रस्ता बांधकामाची चौकशी करून रस्ता दुरुस्ती चे काम सात दिवसाच्या सुरु करण्यात यावे अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल अशी आरोग्य सभापती मलेवार जी यांनी कार्यकारी अभियंता यांनी पत्राद्वारे माहिती कळविण्यात आले.
