खमारी येथे एका ईसमाकडून तहसीलदार व पोलीस पाटील यांना अभद्र कृत्य…

मोहाळी वार्ता:- *पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क ची टीम* जेव्हा मोहाळी तहसील कार्यालय ईथे पोहचवली व जाणून घेतली एस. वाय. चांदेवार नायब तहसीलदार यांच्या कडून मोहाळी तालुक्यातील खमारी गावामध्ये झालेल्या मारपीट प्रकरणी विषयी. चांदेवार साहेबांना रात्री 2 ते 3 वाजे सुमारास एका ईसमाचा ट्रु कॉलर वर फोन आला चांदेवार साहेब त्यावेळी झोपेत असल्याने कॉल काही रिसिव्ह केला नाही. जेव्हा त्यांनी सकाळी 7 वाजे सुमारास त्या नंबर वर कॉल लावला तर त्या ईसमाने रस्त्यावर ट्रक्टर ने अवैध वाहतूक होत असल्याची सुचना नायब तहसीलदार चांदेवार साहेबांना दिली. नंतर नायब तहसीलदार साहेबांनी तहसील कर्मचारी क्रुष्णा भोयर याला भरारी पथकाविषयी कुठे आहे ह्या विषयी विचारले नंतर चांदेवार सा. ऑफिस ची गाडी काढून खमारी गावाला निघाले. नंतर एक रेती भरलेला ट्रक्टर वाहन मोठ्या जोराने गाडी काटत एका भाजीपाला वाद्याच्या पिक अप ला ठोस मारले व पिक अप चा काच तडकला. मग भाजीपाला वाला चांदेवार चांदेवार साहेबांना म्हणु लागला की तुम्ही आल्यामुळे माझ्या गाडीचा काच फुटला नंतर नायब तहसीलदार चांदेवार साहेबांनी खमारी गावातील पोलीस पाटलाला बोलविले पिक अप मालक जयपाल सव्वालाखे ग्राम खमारी हा व्यक्ती पोलीस पाटील यांच्या सोबत वाद घालत बाचाबाची करु लागला त्यावेळी पोलीस पाटीलाने पोलीसांना फोन केले भाजीपाला वाले पिक अप मालक याच्यावर गुन्हा नोंद झाला. नंतर नायब तहसीलदार चांदेवार साहेबांनी अवैध रेती ट्रक्टर चालक शांतीलाल लिल्हारे यांची तक्रार मोहाळी पोलीस स्टेशन ला केली व ट्रक्टर चालक यांच्या वर सुध्दा गुन्हा नोंद होऊ दोन्ही गुन्हे चा तपास मोहाळी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुरेन्द्र बेलखेडे व त्यांची संपूर्ण टीम करत आहे.




