ही अंगणवाडी देत आहे येमदुताला आमंत्रण…

गोबरवाही वार्ता:-तुमसर पंचायत समिती अंर्तगत येणाऱ्या डोंगरी बुजुर्ग ग्रामपंचायत मध्ये रस्ता बांधकाम, महिला हॉल बांधकाम अशा विविध कामात भ्रष्टाचार असल्याचे डोंगरी बुजुर्ग ग्रामस्थांकडून चर्चेचा विषय गरमागरम होत आहे. त्यातल्या त्यात डोंगरी बुजुर्ग गावामध्ये जी अंगणवाडी बणलेली आहे ती अंगणवाडी तलावाला लागुन असुन लहान अंगणवाडी तील सेविकांना मुले सांभाळने महागात पडणार असल्याचे चित्र दिसत आहे. आंगणवाडीत शिकणारे लहान मुल तळाच्या पाठोपाठ फिरायला गेले आणि कोणता मोठा हादसा निर्माण झाल्यास ह्या बाबिला कोण जवाबदार राहणार❓असे बोलले जात आहे. खरंच ती आंगणवाडी ईमारत तिथे नसली तर बरं झालं असतं. आंगणवाडी ईमारतीस किती रक्कम लागली व अंदाजपत्रकानुसार काम झाला काय ❓हे सविस्तर पाहने तेवठेच महत्त्वाचे आहे. गावातील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांकडून चौकशी ची समुळ मागणी केली आहे.

(डोंगरी बुजुर्ग गावातील विकास कामात घोळ झाल्याबद्दल पुढील बातमी पुढच्या अंकात प्रकाशित)

