डोक्यावरचे छप्पर काढुन अंगावर चादर टाकण्याचे पाप करणाचे महायुती सरकारने केले गद्दारांना ५० खोके व लाडक्या बहिणींना फक्त दिड हजार!
–महाविकास आघाडीचे उमेदवार चरण वाघमारे यांची सरकारवर टिका
तुमसर : शेतकNयांचे सरकार म्हणविणाऱ्या राज्यातील महायुती सरकारच्या काळात शेतकरी देशाधडीला लागला आहे. शेतीपयोगी साहित्याच्या वाढलेल्या विंâमती,बी-बीयाने,किटकनाशके व मजुरीचे दर यांची झालेली भरमाढ वाढ यामुळे शेतकNयांना शेती नकोसी झाली आहे. त्यातही शेतकNयांच्या मालाला योग्य भाव नाही,धानाला बोनस नाही,पिकविम्याचा लाभ नाही मग शेतकNयांनी जगावे कसे.एकीकडे शेतकरी संकटात असतांना मात्र याच शेतकNयाच्या नावाने आपली तिजोरी भरणाNयांना हि जनता माफ करणार नाही.सत्ताधारी आमदाराने मागील पाच वर्षात काय केले याचा लेखाजोखा त्यांनी जनतेसमोर मांडायला हवा मात्र ते तसे करूच शकत नाही कारण मागील पाच वर्षात त्यांनी फक्त स्वतःचा व्यापार कसा वाढणार याकडेच लक्ष दिले आहे.आज तुमसर-मोहाडी तालुक्यातील सुशिक्षीत तरूणांची फौज उभी आहे.त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.तालुक्यातील कारखाने बंद होताहेत जे काही आहेत तिथे बाहेरील तरूणांना रोजगार दिला जात आहे. हा स्थानीक तरूणांवर अन्याय नाही का? महागाईने कंबरडे मोडले आहे. डोक्यावरचे छप्पर काढुन अंगावर चादर टाकण्याचे काम या महायुती सरकारने केले आहे. अडीच वर्ष भ्रष्टाचार करून निवडणुकीच्या दोन महिन्यांआधी योजना आणल्या. योजनांच्या जाहिरातींवर सरकारकडून शेकडो कोटी खर्च करण्यात आला तुमच्या योजना सर्वसामान्यांच्या हिताच्या आहेत तर मग जाहिरातीवर एवढा खर्च कशासाठी असा सवाल चरण वाघमारे यांनी यावेळी उपस्थित केला.


महाराष्ट्राची एक उज्वल परंपरा होती. परंतु, या दोन अडीच वर्षात जो काही राजकारणाचा चिखल झाला. त्यामुळे या परंपरेला काळीमा फासण्यात आला. गद्दारांना ५० खोके देणारे सत्ताधारी लाडक्या बहिणींचे फक्त पंधाराशेवरच समाधान करीत आहे, असा टोला चरण वाघमारे यांनी लगावला.



आज चरण वाघमारे यांनी तुमसर तालुक्यातील महालगाव, ब्राह्मणटोला ,वारपिंडकेपार,सोंड्या, सक्करदरा ,घानोड ,कवलेवाडा ,हमेशा चिखला, धूटेरा, पाथरी ,नाकाडोंगरी, आष्टी, लोभी ,चांदमारा ,गणेशपुर, पवनारखारी ,येदरबुची ,गोबरवाही या गावांना भेटी देत प्रचार केला.यावेळी येथील नागरीकांनी चरण वाघमारे यांचे उत्साहात स्वागत करीत चरणभाऊ आगे बढो हम तुम्हारे साथ है च्या घोषणा दिल्या.