तुमसर -मोहाळी विधानसभा क्षेत्रात त्रिकोणी लढत…
कोण बाजी मारेल हे कुणाला अंदाज बांधता येत नाही…
भंडारा जिल्हा वार्ता:-येत्या 2024 च्या विधानसभा निवडणुकीत 20 नोव्हेंबर ला होणाऱ्या निवडणुकीत तुमसर मोहाळी विधानसभा क्षेत्रात त्रिकोणी सामना होण्याचे चित्र सामोरे येत आहे.
मतदारसंघ संघातून येणारा काळ बेरोजगारीचे जो नेता प्रश्न समजेल व बेरोजगारी साठी जो उमेदवार आपली बाजू मांडण्यासाठी सक्षम असेल तोच उमेदवार बाजी मारेल अशी ह्या विधानसभा निवडणुकीत मतदारांकडून चर्चा होत आहे.
मॉईल वर होणाऱ्या मॅग्निज वर आधुनिकीकरणासाठी होणाऱ्या नवनवीन उद्योगांची जो उमेदवार आधारशिला रचेल तोच उमेदवार जिंकेल तर खमाटा येथे बंद पडलेल्या उद्योगांना पुर्ववत सुरू करणे व ह्या क्षेत्रात नवनवीन कंपन्या आणुन बेरोजगारांचे प्रश्न जो उमेदवार मार्गी लावेल तो उमेदवार बाजी मारेल…!
आता ह्या क्षेत्रात राका (अजीत पवार गुट)राजु कारेमोरे, चरण वाघमारे (राका शरद पवार गुट) व निर्दलीय उमेदवार धनेन्द्र तुरकर यांचा त्रिकोणी संघर्ष पाहायला मिळत आहे.
