अखेर बाजी कोण मारणार…?
तुमसर- मोहाळी विधानसभा सिट दोन्ही गटांना प्राण प्रतिष्ठेची निवडनुक
भंडारा जिल्हा वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील तुमसर मोहाळी विधानसभा क्षेत्र खुप नाटकीय वातावरणात होण्याचे राजकीय वर्तुळात चित्र दिसत आहेत.
इकडे शरद पवारांची अजित पवारांनी सात सोडल्यानंतर अजित विरुद्ध शरद असी रंगत आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोबत राष्ट्रवादी भाजपा व शिवसेना (शिंदे गट) हे मित्र पक्ष आहेत तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) आहेत.
आता ह्या निवडणुकीमध्ये काही काँग्रेसचे पदाधिकारी टिकीट न मिळाल्याने नाराज झाल्याचे चित्र दिसून येत आहे पण चरण वाघमारे कसे काय मित्र पक्ष काँग्रेस ला समज घालतात ही बाब तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे !
ईकडीकडे विद्यमान आमदार राजु कारेमोरे यांनी प्रत्येक गावामध्ये विकासशिल कामे केल्याने जिकडेतिकडे त्यांची सुध्दा चर्चा होत असल्याचे बोलले जात आहे.
ह्या निवडणुकीमध्ये राका नेते प्रफुल्ल पटेल सुध्दा विशेष लक्ष घालून आहेत.
अखेर ह्या विधानसभा क्षेत्रात राजु विरुद्ध चरण अशी दुहेरी लढत होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
अखेर रिंगणात जे कोणी उमेदवार उतरनार त्यांचा भविष्य येणारा काळ सांगेल.

सुत्रांकडून अशी माहिती मिळते आहे की बहुजन समाज पार्टी सुध्दा आपला उमेदवार रिंगणात उभे करणार असल्याची माहिती मिळते आहे.
तुमसर मोहाळी विधानसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार व मुंबई विधानसभेत कोण जाणार आणि सत्ता कोणत्या पक्षाच्या हाती जाणार ह्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधले आहे.
