अन्यथा तिसरी आघाडी तयार होणार…!
विधानसभा 2024 निवडणूक
तुमसर-मोहाळी वार्ता:-येत्या विधानसभा 2024 निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी महायुती व विपक्ष महाविकास आघाडी निवडनुकीत सत्ता स्थापन करण्यासाठी अतिशय प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे.

माजी आमदार चरण वाघमारे यांनी महाविकास आघाडीच्या घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यामध्ये प्रवेश घेताच महाविकास आघाडीत काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे) व राष्ट्रवादी शरद पवार गटातील पदाधिकारी व कार्यकर्ते खुप आक्रमक झाले असे दिसून येत असल्याने “भव्य कार्यकर्ता निर्धार मेळावा” घेण्यात आला.

पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माजी आमदार चरण वाघमारे यांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षात काँग्रेस, खंबीर राष्ट्रवादी शरद पवार गट यांना विस्वासात न घेता पार्टी मध्ये प्रवेश घेतला.
ह्या कारणास्तव तिसरी आघाडी तयार होऊ शकते असे संकेत पदाधिकाऱ्यांनी सभेला दिले.
कार्यक्रमाला माजी आमदार अनिल बावनकर, रमेश पारधी सभापती, कलाम शेख, किरण अतकरी,राजेश हटवार, रमेश रगडे, मधुकर कुकडे (माजी खासदार), शिशुपाल पटले (माजी खासदार) तसेच सर्व बुथ कमीटीचे पदाधिकारी, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सर्व सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
