Uncategorized

लोधवडे वनीकरणातील खून झालेल्या व्यक्तीचे चित्र प्रसिद्ध.माहिती मिळाल्यास दहिवडी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन.

याबाबत दहिवडी पोलीस ठाण्यात दि. १४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता लोधवडे गावचे पोलीस पाटील अनिल मल्हारी लोखंडे यांनी अज्ञात व्यक्तीचा खून करून मृतदेह लोधवडे गावच्या हद्दीतील झिरपाडी नावाच्या शिवारातील वनविभागाची जमीन असलेल्या गट नंबर ४०१ मध्ये असल्याची माहिती दिली होती. नंतर सपोनि अक्षय सोनवणेसह त्यांचे कर्मचारी घटनास्थळी हजर झाले. जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक वैशाली कंडूकर, परिविक्षा अधिन पोलीस उपाधीक्षक पानेनावकर सातारा यांनी तपासाची चक्रे फिरवली. सहा दिवस उलटले तरी खूनाचे गूढ उलघडण्यात दहिवडी पोलिसांना यश आले नाही. अखेर त्याचे फोटोचे स्केच प्रसिद्ध करुन याबाबत माहिती असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button