आई. जी. साहेबांची विशेष बैठक…
भंडारा वार्ता:-येत्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने 18 ऑक्टोबर ला डोंगरी बुजुर्ग येथे आंतरराज्यीय सिमा चेकपोस्ट ची बैठक घेण्यात आली. यामध्ये बावनथडी, बपेरा चेकपोस्ट येथे भेट देऊन दोन्ही राज्याची सीमा सुरक्षेसाठी आढावा घेण्यात आला.
सदर बैठकीत महाराष्ट्र, मध्यप्रदेश राज्याचे सन्मवय साधुन कामकाजाबाबत आढावा घेऊन सविस्तर माहिती चा देवान घेवाण करण्यात आला.

सदर बैठकीत डॉ. दिलीप भुजबळ पाटील विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र नागपूर, श्री. संजय कुमार विशेष पोलीस महानिरीक्षक बालाघाट, डॉ. संजय कोलते जिल्हाधिकारी भंडारा, श्री. प्रजित नायर जिल्हाधिकारी गोंदिया, श्री. नुरुल हसन पोलीस अधीक्षक भंडारा, श्री. गोरख भामरे पोलीस अधीक्षक गोंदिया, श्री. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक भंडारा, श्री. मनोहर आचले पोलीस अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क गोंदिया व भंडारा तसेच बालाघाट मध्यप्रदेश येथील वरीष्ठ अधिकारी बैठकीला हजर होते.