Uncategorized
ऑनलाईन सुविधा नसल्याने ग्राहकांना फटका…
गोबरवाही वार्ता:-गोबरवाही पेट्रोल पंप वर आनलाईन पेमेंट न घेतल्यामुळे ग्राहकांना त्रास सहन करावा लागतो. गेली कित्येक दिवसापासून गोबरवाही व अन्य पेट्रोल पंप वर आनलाईन सुविधा बंद करण्यात आली असून पेट्रोल घेणाऱ्या ग्राहकांना याचा फटका बसलेला आहे. आता दिवाळी सन सन येत आहे. नागपूर वरुन येणारे व मध्य प्रदेशातील खुप मोठ्या प्रमाणात ग्राहक येत असतात त्यामुळे ग्राहकांना असुविधा निर्माण होणार आहे . पेट्रोल पंप संचालकाने ग्राहकांना असुविधा होऊ नये ह्या बाबीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.