आरोग्य
नाकाडोंगरी गावात महा आरोग्य व रोग निदान शिबीर संपन्न…!
नाकाडोंगरी वार्ता(पोलीस कि आवाज न्युज डीजीटल मिडिया):-आमदार राजु मानिकरावजी कारेमोरे व मित्र परिवारातर्फे निशुल्क महा आरोग्य व रोग निदान शिबीर प्राथमिक आरोग्य केंद्र नाकाडोंगरी येथे पार पडले. या शिबिरामध्ये नेत्ररोगम, मेडिसीन, सर्जरी, स्त्री रोग, बालरोग, कान नाक घसा, अस्थिरोग, त्वचारोग, श्वसन रोग अशा विविध आजार चे निदान करण्यात आले तसेच औषधी व चश्मे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमात हजारोंच्या संख्येने परिसरातील नागरिक उपस्थित झाले होते.





सर्व उपस्थित नागरिकांना अल्पोहार तसेच जेवणाची व्यवस्था आमदार राजुभाऊ कारेमोरे तसेच मित्र परिवारातर्फे करण्यात आली होती..

