Uncategorized
वरठी सनफ्याॅग कंपनी च्या कंट्राटी कामगाराचा कामावर मृत्यू

भंडारा जिल्हा:-भंडारा जिल्ह्यातील मोहाळी तालुक्यात असलेली वरठी गावातील सनफ्लॅग कंपनी पार्किग एरियामध्ये असलेला गॅरेज मध्ये ट्रकला वेल्डिंग करत असतांना ट्रकचा लोखंडी पल्ला तुटून डोक्यावर पडला त्यावेळी काम करत असलेला कुवरलाल रहांगडाले (वय ४९वर्षे) याचा अपघातात जागीच मृत्यु झाला. त्यानंतर मृतकाच्या कुटुंबीयांनी आर्थिक भरपाई व नोकरी देण्याची अट लावून धरत मृतदेह पोस्टमार्टम नंतर जिल्हा रुग्णालय भंडारा ईथे ठेवला . अट मान्य केल्याशिवाय मृत देहाला हात लावणार नाही असे मृतकाचे कुंटुबाई बोलत होते. अखेर पोलीस , सनफ्लॅग कंपनी चे अधिकारी व मृतकाचे नातेवाईक तोडका काढत अंत्यविधीसाठी मृत्य देह नाते वाचकांच्या ताब्यात देण्यात आला.
