नवनिर्वाचित खासदार प्रशांत पडोळे यांचा नाकाडोंगरी येथे दौरा…
भंडारा जिल्हा-भंडारा -गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित लाडके खासदार डॉ. प्रशांत पडोळे तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी येथे दि-सहकारी राईस मिल सोसायटी च्या प्रागंनात जनतेच्या समस्या जाणण्यासाठी दौरा केला. त्यावेळी त्यांच्या सोबत शिक्षण व आरोग्य सभापती रमेश पारधी व अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


.

खासदार डॉ.प्रशांत पडोळे यांनी जनतेला सांगितले की गोंदिया-भंडारा जिल्याचा विकास करु व जनतेच्या समस्येचा निवारण करु. मा. खासदार साहेबांनी आष्टी, लोभी, नाकाडोंगरी, पाथरी, कवलेवाडा, चिखला, हमेशा तसेच परिसरातील गावाच्या समस्या जाणून घेतल्या.



या कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले आष्टी गावाचे सरपंच ईश्वर गौपाले, नरेंद्र गेडाम (प.स.सदस्य),खुशाल पुष्फतोडे,इ निरंजन गौपाले, संजय मेश्राम, गणेश सोनुसार,पमु गौपाले, वसंत बिटलाये, सावंत खोब्रागडे, चितरंजन पुष्फतोडे, सिताराम गौपाले, अनवर पाछ्या, उमेश नोनारे, पवन गौपाले, निरु मस्की व बहुसंख्य महिला उपस्थित होत्या.
