कृषी
अमृत वृक्ष आपल्या दारी…!
तुमसर वार्ता:-भंडारा जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र कार्यालय तुमसर व सामाजिक वनीकरण विभाग तुमसर यांच्या संयुक्त विद्यमाने “अमृत वृक्ष आपल्या दारी वन महोत्सव 2024 ” हा कार्यक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाअंतर्गत सवलती च्या दरात रोपे विक्री केन्द्र सुरू करण्यात आले.


या कार्यक्रमामध्ये उपस्थित वनपरिक्षेत्र अधिकारी सी. जी. रहांगडाले, नितेश धनविजय वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण तुमसर यांच्या हस्ते रोपे विक्री सुरु करण्यात आली. या कार्यक्रमामध्ये तुमसर येथील सर्व वन कर्मचारी तसेच सामाजिक वनीकरण येथील उपस्थित होते.

