ठानेदार विलास मुंडे यांनी केली नवीन कायद्याची जनजागृती…
मोहाळी तहसील वार्ता:-मोहाळी तालुक्यातील करडी पोलीस स्टेशन अंतर्गत कला विज्ञान महाविद्यालय येथे पोलीस स्टेशन चे ठानेदार विलास मुंडे यांनी १ जुलै २०२४ पासून लागू होत असलेले नवीन कायदे भारतीय न्याय संहिता, नागरीक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम ह्या तिन्ही कायद्याची माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याच्या दृष्टीकोणातून जनजागृती कार्यक्रम पार पाडले.

या कार्यक्रमामध्ये पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरातिल सर्व सहभागी झाले.
यामध्ये ठानेदार विलास मुंडे साहेबांनी
जुने व नवीन कायदे मधिल फरक तसेच नवीन कायद्यात काय बदल झाले असे विस्तृत मार्गदर्शन केले व सदर नवीन कायद्याची जनजागृती करण्याबाबत आव्हान केले.

ह्या कार्यक्रमाला प्रामुख्याने प्रितीताई शेंडे प. स. सदस्य, भुपेन्द पवनकर पत्रकार, शिल्पा तुमसरे सरपंच पालोरा, तृप्ती तिबुडे सरपंच नवेगाव, उषा कांबळे सरपंच देव्हाळा, रिना पंचबुधे सरपंच मोहगाव, विक्की रंगारी सरपंच निलज खुर्द, लिल्लाधर कांबळे सरपंच निलज बुझ, लोकेश रोकडे सरपंच कनळगाव, आत्माराम अतकरी सरपंच बोरगाव, रविशंकर देशकर सरपंच मुंढरी,परिसरातील उपसरपंच , सदस्य, बचत गटाच्या महिला तसेच कला महाविद्यालयातील प्राध्यापिका बेलेकर मॅडम व सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन कला महाविद्यालयाचे प्राध्यापक श्रीयुत धार्मिक सर यांनी केले.



