विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था नाकाडोंगरी मध्ये अध्यक्ष खुशाल पुष्फतोडे तर उपाध्यक्ष अमृत सर्याम
संपुर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
तुमसर वार्ता:-नाकाडोंगरी कार्यकारी सेवा सहकारी संस्था नाका डोंगरी अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत खुशाल पुषप्तोडे विजयी.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित नाकाडोंगरी येथे संस्थेचे 13 संचालक बिनविरोध निवडून आले होते. परंतु अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता चुरस निर्माण झाल्याने दि.29/02/2024 रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरीता निवडणूक घेण्यात आली. अत्यंत चुरशीच्या लढतीत श्री. खुशाल पूषप्तोडे यांनी विजयमिळवून 7 विरुध्द 6 मतांनी ठाकचंद मुंगुसमारे यांचा पराभव केला तर उपाध्यक्ष पदाकरीता श्री. अमृत सर्याम यांनी बळीराम कापगते यांना पराभूत केले.

संस्थेचे नवनियुक्त संचालक मंडळात सर्वश्री जानतराम डोंगरवार, यदुनाथ गोपाले, दिगंबर काशीवार, दिलीप वाघाडे, दीनदयाल परबते यांनी मदत केली तर सर्कल मधील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. श्री ईश्वरजी गोपाले, अमृतजी सोनवाने, निलकंठजी नागपुरे, डॉ.सचिन बावनकर, कपिल जैन, प्रेमचंद गोपाले, हरीराम गोपाले, राजेश उके, भाऊराव पंधरे, मुकेश मुंगुसमारे, गोल्डी घडले, सुरेश गोखले डॉ.रामरतन गोपाले,डॉ. किशोर गोपाले, शालिक गोपाले, यांचे सहयोग प्राप्त झाले. असेच सहकार्य करण्याचे आवाहन अध्यक्षांनी आपल्या धन्यवाद प्रस्तावा त केले.
निवडणूक निर्णय अधिकारी श्री.जिभकाटे यांच्या उपस्थितीत सदर निवडणुक पार पडली.

