क्राइम
अवैध मोह फुल हातभट्टी वर पोलीसांची धाड…!
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा

पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया


भंडारा जिल्हा वार्ता- मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक मान. लोहित मतानी व अपर पोलीस अधीक्षक मान ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन जवाहरनगर व एस डी पी ओ कार्यालय भंडारा यांच्या संयुक्त कार्यवाही ने गोपनिय माहिती च्या आधारे पोलीस स्टेशन जवाहरनगर अंतर्गत मौजा संगम बेट येथे अवैध मोह फुल दारुच्या हातभट्टीवर एसडीओपी बागुल साहेब व जवाहरनगर पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे त्यांच्या पोलीस पथकाने मोक्यावर धाड मारुन अंदाजे ३लाख ३५ हजाराचा मुद्दे माल जप्त करण्यात आला. ह्या कार्यवाही मध्ये आरोपी गणेश जगनाडे,हिवराज खंगार, अतुल बंसोड यांच्या वर कार्यवाही करुन अनुक्रमे अप. क्र. ६१/२०२४कलम ६५(फ) म. दा. का. तसेच अप. क्र. ६२/२०२४कलम ६५(फ) म. दा. का. व अप. क्र. ६३/२०२४कलम ६५(फ) असे गुन्हे नोंद करण्यात आला.




