छत्रपती शिवाजी महाराज “जन्मोत्सव सोहळा 2024 ” प्रथम जल्लोष ‘शीवस्फूर्ती मॅराथॉन’ संपन्न

पोलिस स्टेशन तुमसर अणि छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठानच्या संयुक्तिक आयोजनातून दिनांक 17 /02/2024 रोज शनीवार ला नवीन बसस्थानक जवळ व मातोश्री सभागृहा च्या भव्य प्रांगणात प्रत्येकी खुल्या गटातून मुले 8 कि. मी व मुली 6 कि. मी तर वय वर्ष 9 ते 15 वयोगट मुले मुली असे स्वरूप असलेल्या “शीवस्फूर्ती मॅराथॉन” स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. स्पर्धेत विजयी ठरलेले खुल्या गटात अनुक्रमे मुले 1. लीलाराम बावणे देव्हाडा 2.अजित उके, सूरेवाडा तर मुलींच्या गटातून अनुक्रमे 1. कु. प्राजक्ता गोडबोले, नागपूर 2.कु. वैशाली वंजारी, डोंगरगाव यांनी पारितोषिक पटकाविले. तर वयोगट 9 ते 15 मधून मुले 1. प्रज्वल राऊत, बपेरा 2.प्रियम बांते, खैरी तर मुलींच्या गटातून 1.सानवी देशकर 2.आकांक्षा बागडे यांनी पटकाविले. कार्यक्रमाची सुरुवात स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन, दीपप्रज्वलन व माल्यार्पण करून करण्यात आली. या प्रसंगी श्री. प्रदीपदादा पडोळे, किशोरजी चौधरी, आस्था कॉम्प्युटर चे संचालक श्री.राजेंद्रजी लाखनकर सर, युवा मोर्चा पदाधिकारी शुभम मिश्रा,अनुज मलेवार, आशिष भुरे, शिव सर, श्रीमती. मीराताई भट, श्रीमती.अदिती काळबांडे, श्रीमती. रुखमाताई धांडे, पत्रकार श्री. देवेंद्रजी टेंभरे, श्री. गणेशजी बर्वे, श्री.सुशील आथीलकर इत्यादीं मान्यवरांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली. कार्यक्रमाची धुरा श्री. सुधाकर कहालकर सर तर वैद्यकीय सेवा सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथील डॉ. विजय पारधी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सांभाळली. कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन पोलिस स्टेशन तुमसरचे पोलिस निरीक्षक सन्मानीय श्री. नीलेश ब्राम्हणे सर, पोलिस स्टेशन तुमसर, व छत्रपती शिवशंभू प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष श्री. इंजि. नितीन धांडे प्रतिष्ठान चे मार्गदर्शक सचिव प्रा. अमोल उमरकर, उपाध्यक्ष उपाध्यक्ष विक्की साठवणे कोषाध्यक्ष प्रतीक बुद्धे, अंकुश गभने, संपर्क प्रमुख कोमल वानखेडे, प्रज्वल बुद्धे, नितीन सार्वे, अंकित तुमसरे, मनीष गायधने, सुमित जिभकाटे, सतीश दमाहे, नितिन दमाहे, अक्षय दमाहे, मनोज बोपचे, मयूर पुडके, तुषार बागडे, सचिन मलेवार, भूषण पडोळे, तेजस श्रीरंगे, धनंजय समरीत, योगेश बेनीवेगळे, आकाश बारसागडे, भास्कर शेंडे, संजू बूधे, विशाल ठाकरे, मोसम वानखेडे, ऋषी धांडे, युवणेश धांडे, प्रवीण धांडे, संकेत बुधे, शुभम निमकर, नितिन गोलीवार, यश चवले, हेमंत खोब्रागडे, योगेश वासनिक, प्रशांत वासनिक, दिपाली मते, साक्षी चन्ने, गुंजन ढबाले, कनक नागमोते, श्वेता बोरकर तसेच देव्हाडी येथील शीवस्वराज्य ग्रुप चे सर्व मावळे व इतर यांच्या परिश्रमातून प्रस्तुत कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.



स्वार्थी करमकर
न्यूज रिपोर्टर(पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया)
महिला प्रतिनिधी
तालुका तुमसर

