माणगंगा निधी लिमिटेड तर्फे भाविकांना मोफत पाणी वाटप
पोलीस कि आवाज न्यूज प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सहसंपादक


नेरुळ:- दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री वामनभाऊ व भगवानबाबा यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या उत्साहात नेरुळ येथील गावदेवी मैदानात साजरा करण्यात आला. त्यानिमित्ताने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन श्री वामनभाऊ व भगवानबाबा प्रतिष्ठानने केले होते. सलग सात दिवस चाललेल्या सप्ताहाचा आज शेवटचा दिवस होता. त्यानिमित्ताने श्री वामनभाऊ व भगवानबाबा यांचे प्रतिमेची मिरवणूक व दिंडी टाळ्यांच्या गजरात व वारकऱ्यांच्या मुखात हरिनाम चा जयघोष करत काढण्यात आली. हरीनामाचा जयघोष करत दिंडी “माणगंगा मल्टिपर्पज निधी लिमटेड’ च्या नेरुळ सेक्टर १० मधील कार्यालयापाशी आल्यानंतर चेअरमन संतोष घाडगे साहेब यांनी सर्वांचे स्वागत केले व बँकेचे वतीने दिंडीतील वारकऱ्यांना मोफत पाणी वाटप करण्यात आले.
यावेळी मानगंगा मल्टिपर्पज निधी लिमिटेड चे अध्यक्ष संतोष घाडगे साहेब त्यांच्या समवेत अध्यक्षा जयश्री घाडगे मॅडम, मॅनेजर जयेश आहेर, असिस्टंट मॅनेजर कोमल मॅडम, मार्केटिंगचे सुदेश देवगिरे , प्रियंका बोर्गे, प्रिया काळे उपस्थित होते.




