शालेय
कॉफी मुक्त अभियान जिल्ह्यात राबवा-जिल्हाधिकारी योगेस कुंभेजेकर
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकांपर्यंत पोहचणारा
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

भंडारा जिल्हा वार्ता-दहावी ची परीक्षा १मार्च ते २६ मार्च व बारावी ची २१ फेब्रुवारी ते १९ मार्च ला सुरू सुरु होणार आहे. ह्या परिक्षा विद्यार्थांच्या महत्त्वाच्या परिक्षा असुन त्यातुन विद्यार्थांचे भविष्य कायम ठेवत जिल्हयात कॉफी मुक्त अभियान राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजेकर यांनी दिले.
जिल्ह्यातील सर्व केन्द्र प्रमुख , मुख्याध्यापक व परिक्षकाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, उपशिक्षनाधिकारी मंगला गोतारने, व जिल्हा माहिती अधिकारी शैलेजा वाघ उपस्थित होत्या .
शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र सलामे यांनी शिक्षण विभागाच्या सुचनेनुसार कॉफी मुक्त परिक्षा अभियानाबाबत विस्तृत माहिती दिली. त्यामध्ये दक्षता समिती ची निवड करण्यात आली तसेच प्रशासना तर्फे भरारी पथकाचे गठन करण्यात आले.

केन्द्रावर विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात यावी व विद्यार्थी नी ची तपासणी शिक्षिका, मदतनीस यांच्या द्वारे करण्यात यावी.

परिक्षा केन्द्र परिसरात धारा १४४ कलमाचे पालन करण्यात यावे अशी सुचना माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी दिली.

