विकसित भारताच्या वाटचालीत महिलांचा अधिक सहभाग मजबुतीने होईल -उपराष्ट्रपती जगदिप धनखड
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
गोंदिया जिल्हा वार्ता-नारी शक्ती विधेयक पारित केल्याने येत संसदेत महिलांचा मोठा सहभाग राहणार असल्याचे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती जगदिप धनखड यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले.

स्व. मनोहरभाई पटेल यांच्या ११८व्या जयंती समारोह कार्यक्रमात धोटे बंधु विज्ञान महाविद्यालयाच्या पटांगणावर उपराष्ट्रपती जगदिप धनखड व त्यांची पत्नी डॉ. सुदेश धनखड, राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा पालकमंत्री धर्मराव बाबा आत्राम, खासदार सर्वश्री सुनील मेंढे, प्रफुल्ल पटेल, डॉ. श्रीकांत शिंदे, डॉ. सी रमेश, राहुल क्रुष्णा,आमदार सर्वश्री विनोद अग्रवाल, विजय रहांगडाले, राजु कारेमोरे, जि. प. अध्यक्ष पंकज रहांगडाले, गोंदिया शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा वर्षा पटेल आदी उपस्थित होते.

त्यांनी केन्द्र सरकारच्या विविध जनहितकारी व गरीब लोकांसाठी योजनांची माहिती आपल्या भाषणात सांगितली. शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पिक विमा देऊन राज्य व केन्द्र सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी उभे आहे असे सांगितले.

गोंदिया शिक्षण संस्थेची उभारणी करून स्व. मनोहरभाई पटेल यांनी भंडारा-गोंदिया शिक्षणाची गंगाच ह्या भागात प्रवाहीत केली त्यांच्या केलेल्या आदर्श कार्याला निष्ठा व प्रामाणिकपणे जपलेल्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोंदिया नगरपालिकेच्या माध्यमातून मनोहरभाई पटेल यांनी नगरपरिषद ते संसद आणि विधिमंडळाचे त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली आहे ह्या नगरपरिषदेच्या उत्कृष्ट भवन निर्माण करण्यासाठी राज्य शासन ३०कोटी निधी देईल असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली.
या समारंभात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील प्रगतशिल शेतकरी, गुणवंत विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, क्रीडा पट्टु, पत्रकार यांना गौरवण्यात आले.

ह्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक खा. प्रफुल्लभाई पटेल यांनी केले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी केले.




