राजकीय

तुमसर युवक काँग्रेसची आढावा बैठक संपन्न..!!

शेकडोच्या संख्येने तालुका व शहरातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रभावशाली

तुमसर वार्ता:-तुमसर तालुका व शहर युवक काँग्रेसची आढावा बैठक दिनांक ०६/०१/२०२४ रोज शनिवारला तुमसर मोहाडी युवक काँग्रेस विधानसभेचे अध्यक्ष प्रफुल बिसने यांच्या अध्यक्षतेखाली तुमसर येथे संपन्न झाली. यात प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार अनिल भाऊ बावनकर, प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव जय डोंगरे, भंडारा जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष पवन वंजारी, तुमसर युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष उमेश पटले, शहर युवक काँग्रेस अध्यक्ष प्रफुल गायधने, युवक काँग्रेस जिल्हा सचिव धर्मेंद्र कटरे, विधानसभा महासचिव निलेश आहिरे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून भंडारा जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष कलाम भाई शेख, जिल्हा महासचिव उमेश कटरे, अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष सुरेश मेश्राम अनुसूचित जनजाती जिल्हाध्यक्ष अशोक उईके, तालुका अनुसूचित जाती अध्यक्ष अजय गौरेकर सुद्धा उपस्थित होते.

या बैठकीमध्ये युवक काँग्रेसकडून वेळोवेळी झालेल्या कामांचा आढावा जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांच्या कडून घेण्यात आला. सध्या परिस्थितीमध्ये देशात सुरू असलेल्या देशाच्या राजकारणाला लोकशाही आणि संविधानाच्या मार्गाने कसा थांबवता येईल यावर कलाम शेख यांनी युवकांना मार्गदर्शन केले. तसेच भविष्यात येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये युवकांच्या मह्त्वपूर्ण सहभाग राहणार यासाठी प्रत्येक बूथवर प्रदेश युवक काँग्रेसचा कार्यक्रम युथ जोडो बूथ जोडो राबवून युवकांना जोडण्यात यावा आणि जिल्हा परिषद व पंचायत समिती सर्कल प्रमुखांची नेमणूक करण्यात यावी या संदर्भात चर्चा करण्यात आली. सोबतच तालुका युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र सुद्धा देण्यात आला.

यात प्रामुख्याने युवक तालुका उपाध्यक्ष मुन्ना कांबळे, शुभम चौधरी, शहर उपाध्यक्ष जयंत कोहरे, महासचिव सावन खोब्रागडे, अजहर शेख, विकास उपरीकर, तालुका सचिव अरविंद डोळस, विकास नगरधने, अरविंद विणकणे, सोमेश्वर पारधी, मोबीन शेख, शंकर मरसकोल्हे, अनिल पारधी, रत्नदीप रामटेके, अमित उपरीकर, जगदीश बोरघरे, इरसाद शेख, अंकित भुतांगे, रुपेश रोकडे, प्रवीण बिसणे, राकेश पवारे, रोहित डोळस, महेश सोनवणे, निशांत अग्रे, अक्षय डोळस, रोहित चौधरी, समीर भोयर, मिलिंद कांबळे, पवन गोपाले, प्रदीप नागपुरे, प्रफुल्ल शेंडे, सचिद्र पटले, विजय चौधरी, अंगद चौधरी, सुनील चौधरी, तुलसीदास पटले, गौस अली सय्यद, सलमान शेख, सुरेंद्र लांजेवार, अतुल पटले, सलमान पठाण, श्रीकांत बनसोड व अमित खोब्रागडे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button