कृषी
दुधाच्या भावाचे दर कमी झाल्याने पशुपालक चिंतेत

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त प्रभावशाली
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा वार्ता -भंडारा जिल्ह्यात ग्रामीण भागात कितीतरी पशुपालक असुन दुधारु जनावरे पालुन करुन आपली उपजीविका चालवित असतात.भंडारा जिल्हा कृषी प्रधान असुन ह्या जिल्ह्यात दुग्ध व्यवसाय अधिक प्रमाणात आहे, परंतु दुधाचे दर दिवसोंनिदिवस कमी होत असल्याचे पशुपालकांना दुग्ध उत्पादन करने नकोसे झाले आहेत, त्यातल्या त्यात पशुखाद्य्याच्या भारी वाढ झाली आहे आणि दुधाच्या दरात भारी घसरण होत आहे जेने करुन पशुपालकांना उपजीविका चालविने खुप कठीण झाले आहे त्यातल्या त्यात दुध संकलन केंद्र वाढत असल्याने त्यांच्यात स्पर्धा निर्माण होत असुन ग्राहक खुप हलचलीत आहे.

पशुपालकांना उपासी राहण्याची वेळ येऊ नये त्यामुळे दुधाच्या दरात वाढ झाली पाहिजे ह्यासाठी शासनाने लक्ष देण्याची गरज आहे.

