मॅग्नीज ओर इंडिया लि.डोंगरी बुजुर्ग खान यांच्या विरोधात गावकऱ्यांनी केला एल्गार…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
तुमसर वार्ता -तुमसर तालुक्यातील केन्द्र सरकार द्वारा संचालित मॅग्नीज ओर इंडिया लि.च्या डोंगरी खान विरोधात डोंगरी बुजुर्ग गावातील लोकांनी मांग केली कि डोंगरी बुजुर्ग परिसरातील लोकांना डोंगरी बुजुर्ग खान मध्ये स्थानिक लोकांना रोजगाराध्ये प्राधान्य देण्यात यावे कारण की ह्या परिसरात शेती व्यतीरिक्त कोणताही दुसरा व्यवसाय नसल्याने ह्या परिसरात बेरोजगारी चे सावट आहे.त्यामुळे स्थानिक नागरिकांनी रोजगार उपलब्धी करिता मॉईल विरोधात कंपनीला जाणारा पाणी बंद करुन बंद करून निषेध केला.त्यानंतर मॉईल प्रबंधक चौधरी यांनी आंदोलनकर्त्यांना भेट देऊन त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचा आश्वासन दिले त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आला.
ह्या आंदोलनात विवेक रहांगडाले (पं.सं.सदस्य) ,तोपलाल रहांगडाले (माजी सरपंच), राजकुमार तोलानी (उपसरपंच),शाम बिसने, राजकुमार रहांगडाले , समस्त ग्रामवासी व ठेकेदार उपस्थित होते.




