राज्य
महामहीम राज्यपाल रमेश बैस भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया
भंडारा जिल्हा वार्ता:-महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल रमेश बैस ८ डिसेंबर ला भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत,व आदिवासी विकास मंत्री तथा भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित हे सुध्दा भंडारा जिल्ह्यात दौऱ्यावर येत आहेत अशी
माहिती जिल्हा माहिती अधिकारी भंडारा कार्यालयातुन पोलीस कि आवाज न्युज मिडिया ला प्राप्त झाली.
मान.महामहिम राज्यपाल रमेश बैस भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथे सकाळी १०.५५ ला डिफेन्स सर्विसेस ॲकेडमी येथे आगमन होईल तसेच सकाळी ११ते १२.३०दरम्यान विकसित भारत संकल्प यात्रेला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुपारी २.०५ वाजे.चिखली येथील शेतकऱ्यांशी संवाद साधतील तिथुन दुपारी २.३०वाजे.चिखलीतुन राजभवन नागपूर येथे रवाना होतील,तसेच पालकमंत्री विजयकुमार गावित दुपारी १.०० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत संवाद साधुन दुपारी ३.०० वाजे.भंडारा येथुन नागपुर ला रवाना होतील.




