प्रहार अपंग क्रॅांती संघटना तालुका तुमसर तर्फे खापा येथे जागतिक दिव्यांग दिन साजरा
संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त लोकप्रिय
पोलीस कि आवाज न्युज डिजिटल मिडिया

तुमसर वार्ता:- दिनांक -०३/१२/२०२३ रोज रविवारला प्रहार अपंग क्रॅांती संघटना तालुका तुमसर तर्फे जागतिक दिंव्याग दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला, सर्वप्रथम ग्रामपंचायत खापा येथुन जिल्हाध्यक्ष मा.श्री. रविभाऊ मने यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व दिव्यांग बांधवांची रॅली काढण्यात आली,रॅलिमंध्ये दिव्यांगा प्रती सामाजीक जन-जागृती व्हावी या करीता स्लोगन,चारोळी,घोषवाक्या च्या मधुर स्वरात रॅली काढण्यात आली, “हक्क देउ संधी देऊ,दिव्यांगांना प्रोत्साहन देऊ” अशा म्हणीच्या गजरात रॅलिच आयोजन करण्यात आल, पुर्ण गावात रॅली फीरवुन लोकांना अपंगा प्रती जागविण्याचे मोलाचे कार्य करण्यात आला
त्यानंतर खापा बाजार परिसरात
दिव्यांग बांधवांच्या हस्ते वृक्षारोपन कार्यक्रम घेण्यात आला,, या वेळी दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावरचा भाव झाळाळत होता. एक वेगळीच खुशी त्यांच्यात दिसुन आली..

“जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर”
“स्वावलंबी करुन देऊ आधार”
“जागतिक अपंग दिनी”
“मानोबल वाढवु त्यांचे खास”
त्यानंतर सर्व पाहुण्यांचे तसेच दिंव्याग बांधवांचे नियोजीत कार्यक्रम स्थळी आगमन झाल.. त्यानंतर लगेच पाहुण्यांना मंचावर आमंत्रीत करुन त्यांच्या शुह हस्ते महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय तसेच भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॅा. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेच्या समोर दिप प्रज्वलीत करुन, पुजन करुन स्वागत करण्यात आला.

त्यानंतर आलेल्या पाहुण्याचा सत्कार,स्वागत करण्यात आला, नंतर पाहुणे मंडळींच्या मार्ग दर्शनाला सुरुवाल झाली, त्यामंध्ये प्रहार अपंग क्रॅांती संघटना जिल्हा सचिव मा.श्री. योगेश्वर रविंद्रजी घाटबांधे,यांनी दिव्यांगासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजना, स्पोर्ट कोट्यामधुन दिंव्यांग बांधवांना नोकरीची संधी आणि त्यानी खचुन न जाता कसे सघर्ष करुन आपले लक्ष गाठल पाहीजे या विषयी मोलाच मार्गदर्शन केले
तसेच लाखनी तालुका अध्यक्ष श्री. सुनिल भाऊ कहालकर यांनी सुध्दा अपंगांना सामाजीक जिवनात येनाऱ्या अडचनी व त्यावर कशा प्रकारे मात करता येईल याबाबत मोलाचे मार्गदर्शन केले
त्याचबरोबर श्री. राजेंद्र भाऊ पिकलमुंडे सामाजीक कार्यकर्ता यांनी दिंव्यांग,निराधार,विधवा,जेष्ठ नागरीक,दिव्यांग बांधवांना स्पेशल घरकुल योजना तसेच ग्रामपंचायत तर्फे दिल्या जाणाऱ्या विविध योजना विषयी मोलाच मार्गदर्शन केल.
तसेच ग्रामपंचायत खापा येथील सरपंच मा.सौ.किर्तीताई पिकलमुंडे,उपसरपंच मा.श्री.हंसराज भाऊ ठवकर यांनी सुध्दा दिंव्यांग बांधवांसाठी कोण-कोणत्या योजना शासन राबवितो आणि दिंव्याग बांधवांनी कशा प्रकारे लाभ घेतला पाहिजे या विषयी मोलाच मार्गदर्शन केल.
कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा.श्री. राजकुमारजी माटे ओ.बी.सी.सेल रॅा.कॅा. भंडारा यांनी सांगीतल की, शासन दिव्यांग,निराधार,विधवा,दर्धर आजार या विषयी अनेक योजना राबवितो परंतु त्या योजनेची माहिती सामान्य गरजवंत घटकापर्यत पोहचत नाही किंवा चुकीच्या स्वरुपात पोहचविली जाते त्या करीता त्यांनी उपाय योजना सांगीतली की, प्रत्येक तालुका अध्यक्षांनी किंवा ग्रामपंचायतीने शासनाचे जी.आर./परीपत्रके/मंत्रीमंडळ निर्नयाची एक प्रत जवळ ठेवुन गरजवंता पर्यंत पोहचविली पाहीजे, त्याचबरोबर दिंव्याग प्रमानपत्र लाभाची मर्यादा ४० % वरुन घटवुन २५ ते ३० % करण्यात यावी अशी मागनी त्यांनी अध्यक्ष साहेबांच्या माध्यमातुन बच्चु भाऊ कडू यांना केली.
भंडारा जिल्हा प्रहार अपंग क्रॅांती चे जिल्हा अध्यक्ष मा.श्री. रविभाऊ मने यांनी आपल्या मार्गदर्शनातुन सांगीतले की, दिंव्याग हा एक शाॅप नाही, कोणी जन्मताच दिव्यांग असतो तर कोणी एखाद्या अपघातात एखादा अवयव गमावतो, म्हणुन समाजाने दिंव्यागाकडे बघतांना चांगल्या नजरेन पाहाव नाहीतर सन २०१६ च्या दिंव्याग कायद्या नुसार दिव्यांगा प्रती अपशब्द बोलल्यास. कायदेशीर कार्यवाही पन होऊ शकते अस त्यांनी सांगीतले, जर गाव पातळीवर दिंव्यांगाच्या समश्या असतील तर, त्यांनी संमधीत तालुका प्रमुखा कडे निवेदन द्यावे ते नक्कीच आपल्या समश्या सोडवतील ते समश्या सोडवु शकले नाही तर, जिल्हा पातळीवर समश्या सोडविल्या जातील अशी ग्वाही त्यांनी या प्रसंगी दिली..
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.रविभाऊ मने प्रहार अपंग क्रॅांती संघटना भंडारा जिल्हाध्यक्ष यांनी भुषवीले तर प्रमुख उपस्थीती श्री.योगेश्वर रविंद्रजी घाटबांधे,
शिव छत्रपती राज्य पुरस्कार प्राप्त पॅरा एथलेटिक्स नॅशनल खेळाडू भारत महाराष्ट्र श्री. राजकुमारजी माटे ओ.बी.सी. सेव रॅाका भंडारा,सौ.किर्तीताई पिकलमुंडे सरपंच खापा,श्री. हंसराजजी ठवकर उपसरपंच खापा,श्री. उपासरावजी तितीरमारे पो.पा.खापा,श्री.राजेंद्र भाऊ पिकलमुंडे सामाजिक कार्यकर्ता खापा, कावळे जी भंडारा,खुशालजी भोयर ग्रा.प.सदस्य,कैलासजी तितीरमारे जिजाऊ विद्या मंदिर खापा,कु.रजनी सव्वालाखे भंडारा,उमरावजी डोकरीमरे भंडारा,शिवदासजी वाहाणे,प्रदिपजी मानकर,शतिशजी पटले, रविचंद गणविर,प्रभुजी टेटे,अजय मोहतुरे,टवरचंद हाडगे,कुकडे ताई करडी,जयशंकर कनपटे,शिला बांते,गोपिका टेटे,भगवान ठवकर, संजय गणवीर, राजकुमार झझाड, रेखा सिंगाड़े, सुल्का हलमारे, कैलाश अतकरी, मानापुरे, बेबीबाई तितिरीमार, चित्रलेखा टवकर, भोयरजी, देसमुख, सुखादश तलवारे,डॅा.सोनेवाने जी, तसेच
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेषराव गणविर तुमसर तालुका प्रमुख यांनी केल, सुत्रसंचालन बुराडे सर परमात्मा एक सेवा समिती तर आभार प्रदर्शन पप्पुभाऊ बोंदरे यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक मा.श्री.शेषराव गणविर तुमसर तालुका प्रमुख प्रहार अपंग क्रॅांती संघटना तसेच संघटनेचे पदाधिकारी.



