आयुध निर्माणी जवाहरनगर भंडारा येथे भारतीय संविधान दिवस साजरा!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज मिडिया
जवाहरनगर वार्ता:-आयुध निर्माण जवाहरनगर (भंडारा) येथे भारतीय संविधान दिवस मल्टी परपज बहुउद्देशीय सभागृह (एम.पी.हॉल) मध्ये दोन दिवसीय कार्यक्रम साजरा करण्यात आला.कार्यक्रमात पहिल्या दिवशी उद्घाटकीय भाषणात मुख्य वक्ता माजी न्यायमूर्ती बी.जे.कोळसे पाटील यांनी भारतीय संविधाना बद्दल मार्गदर्शन केले.

व्यासपीठावर आयुध निर्माणी जवाहरनगर भंडारा चे महाप्रबंधक सुनील सप्रे,समता सैनिक महा.बौधिक प्रमुख भास्कर काबंळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांचे पुजन व भारताचे संविधान प्रास्ताविकतेचे वाचन करण्यात आले.
आयुध निर्माणी चे महाप्रबंधक सुनील सप्रे यांनी प्रास्ताविक भाषणात भारताचे एक सार्वभौम धर्म निरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याच्या नागरिकांना सामाजिक आर्थिक राजकीय न्याय विचार विश्वास श्रद्धा समानता हेच संविधानाची आत्मा आहे असे विचार सांगितले तसेच भास्करजी कांबळे यांनी भारतीय राजकारण व संविधान यांच्यावर आपल्या मत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली जावळेकर तर प्रास्ताविक अमोल मेश्राम यांनी केले.
आभार धिरज कुकवार यांनी मांडले.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता सचीन टेंभुर्णेकर ,अमित मानकर, देवेन्द्र गेडाम,अतीव दुपारे,एस गेडाम, राहुल नांदगाये,जितु मेश्राम, सुधीर वासनिक, विनोद डांगळे, चन्द्रशेखर मेश्राम, निशांत बागळे,रजनिश बागडे,प्रविन वालके, कैलाश बावने,आकाश चलते,सचीन शाहु,अनील तिरकाम,अमोल राहुलगळे,मोहन मिना, विकास सावळे, प्रफुल्ल देशपांडे, सुरेश तांडे, सुभाष मेश्राम आणि संविधान दिन समारोह समिती,समता सैनिक दल व डेमोक्रॅटिक मजदुर संघटना,आयुध निर्माण कर्मचारी व अधिकारी वर्गाचे विशेष योगदान लाभले.




