प्रहार अपंग क्रॅांती संघटने तर्फे संविधान दिन साजरा करण्यात आला तसेच २६/११ हमल्यात शहिद झालेल्या सुर-विरांना श्रध्दांजली कार्यक्रम आयोजीत करण्यात आला.

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज मिडिया
तुमसर वार्ता:-दिनांक २६ नोव्हेंबर २०२३ रोजी, प्रहार अपंग क्रॅांती संघटने तर्फे मौजा खापा येथे
संविधान दिवस साजरा करण्यात आला.
तसेच २६/११ हल्ह्यात शहिद झालेल्या सुर-विरांना श्रध्दांजली कार्यक्रम आयोजीत करण्यात आला. कार्यक्रमा दरम्यास खापा गावात तसेच कार्यक्रमात उपस्थीतांना भारतीय संविधानाची उद्देशिका वाटप करण्यात आली तसेच सर्व उपस्थीतांनी संविधान उद्देशिका प्रतीज्ञा घेण्यात आली तसेच २६/११ च्या हमल्यात शहिद झालेल्या विर सपुतांना दोन मिनीटाचे मौन पाळुन आदरांजली वाहण्यात आली.

कार्यक्रमाला प्रमुख उपस्थीत सौ.कीर्तीताई पिकलमुंडे सरपंच खापा (तुमसर) यांनी भारतरत्न डॅांबाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमेचे पुजन करुन २६/११ च्या दिवशी सहिद झालेल्या सुर-विरांना भावपुर्ण आदरांजली दीली व त्यांनी सांगीतले की, भारतीय समाजाला खऱ्या अर्थाने डॅा.बाबासाहेबांनी दिलेल्या राज्य घटनेच्या आधारावर आपले सामाजिक,आर्थीक व राजनैतीक न्याय, विचार या विषयावर सर्व उपस्थीतांना मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री. शेषरावजी गणविर तुमसर तालुका प्रमुख प्रहार अपंग क्रॅांती संघटना यांनी भारतीय संविधान व संविधानाचे महत्व आणि समाजाला संविधानाची गरज का बर आहे या विषयावर जाणिव जागृती पर मार्गदर्शन केले.
तसेच श्री. अजयजी यादव यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
कार्यक्रमाला उपस्थीती..
कीर्ति पिकलमुंडे सरपंच खापा,संजय गणवीर, शैलेशजी कोल्हटकर, कैलाश तितिरमारे,अजय यादव, बिसन ठवकर, डॅा. सुभाष सोनवाने, सुखादास ठवकर, भगवान ठवकर, टवरचंद हाडगे,प्रभाकरजी टेटे, संतोष हलमारे, रवीचंद गणवीर, जयेश मोहतूरे, इत्यादि। उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक श्री शेषराव आर.गणविर तुमसर तालुका प्रमुख प्रहार अपंग क्रॅांती संघटना यांच्या माध्यमातुन करण्यात आला.




