तुमसर तालुक्यातील आष्टी गावात वाघाची धुमाकूळ…!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज मिडिया
तुमसर तालुका वार्ता:- संपूर्ण भारत देशात लोकसंख्या झपाट्याने वाढत असल्याने व जंगलात शेती व घर बांधण्यासाठी जनता अतिक्रमण करत असते. जंगलाचा व्याप दिवसेंदिवस कमी असल्याने जंगलातील प्राणी गावाच्या आजुबाजुला विचरण करतांना लोकांना आढळून येतात.

अशीच घटना तुमसर तालुक्यातील आष्टी गावात पाहावयास मिळत आहे.त्या गावात सायंकाळी सहा वाजेदरम्यान कित्येक लोकांना जंगलाचा राजा वाघ हा बघितला अशी चर्चा गावात आहे.
ग्रामपंचायत आष्टी ने वाघापासुन सावध राहण्याची मुनादी दिली होती.



विश्वनाथ उका नागपुरे या व्यक्ती च्या बकऱ्याला ठार मारण्याची घटना घडली.ह्या घटनेच्या तपासात यादव वनपाल नाकाडोंगरी,वाघाडे, देशमुख,कु.शेंडे, ड्रायव्हर भांडारकर व गावकरी उपस्थित होते.बातमी लावण्याआधी “पोलीस कि आवाज न्युज मिडिया”माहिती मिळाली की फक्त बकऱ्याचा उसवाडीत रक्त आढळला.पुढील तपास वनपरिक्षेत्र अधिकारी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
काही दिवसांपूर्वी कित्येक गाई-मशी मारले.
वनविभागाने वाघाचा कायमचा बंदोबस्त करावा अशी जनतेची अपेक्षा आहे.



