खो खो स्पर्धेत विद्यार्थीनीनीं मिळवलेल्या यशाबद्दल व त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचा कुंभेज येथे सन्मान सोहळ्याचे आयोजन.

पोलीस की आवाज न्यूज नेटवर्क वार्ता प्रमिला जाधव (पश्चिम महाराष्ट्र) सह संपादक
खो खो मध्ये विद्यार्थीनीनीं मिळविलेल्या यशाचे व त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे कौतुक सन्मान सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेज येथे दिनांक २४/११/२०२३ वार-शुक्रवार रोजी आयोजित केलेला असून या सन्मान सोहळ्यास आपण उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती. शाळा व्यवस्थापन समिती ने केली आहे,

मॉडर्न खो-खो असोसिएशन सातारा यांच्यावतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धेतून अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेजने मिळविलेले यश कौतुकास्पद आहे. त्यातून महाराष्ट्र व नॉर्थ महाराष्ट्र या दोन संघाची निवड करण्यात आली यावेळी महाराष्ट्र संघातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुंभेज शाळेतील कु सायली दादासो भोसले व कु स्नेहल ईश्वर भोसले या दोन विद्यार्थिनींची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
तसेच नॉर्थ महाराष्ट्र संघातून कु श्रावणी भाऊसाहेब कन्हेरे व कु अनुष्का उमेश थोरे, स्नेहल शिंदे व सिद्धी काळे या मुलींची निवड झाली आहे.
या सर्वांना मार्गदर्शन करणारे शाळेतील क्रीडा शिक्षक श्री शहाबुद्दीन मुलाणी सर, मुख्याध्यापिका अंजली निमगिरे मॅडम व सर्व शिक्षक ,शिक्षिका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे,.शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री गणेश कादगे ,श्री आण्णासाहेब साळुंखे ,श्री विकास कन्हेरे गुरुजी, रणजीत कादगे सरपंच उपसरपंच ,ग्रामस्थ व पालकवर्ग यांनी या यशाबद्दल सर्वांचे अभिनंदन केले.ग्रामीण भागातील शाळेने मिळविलेल्या यशाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.या कौतुक सन्मान सोहळ्यास सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती शाळा समिती कमिटी ने केली आहे.



