जिल्हा

बिबट्याच्या मृत्यू प्रकरणी एकाला अटक

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

भंडारा जिल्हा वार्ता – भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रातिल सहवनक्षेत्र कवलेवाडा नियत क्षेत्र सितासावंगी येथील महसुल विभाग सर्वे क्र.१०८मध्ये वनकर्मचारी यांना वनगस्ती करतांना एक बिबट मृत अवस्थेत आढळून आला ह्या बिबटाचा मृत्यू विद्युत सापळा च्या लावल्याने वनविभागाच्या चौकशीत निष्पन्न झाले.
ह्या बिबट्याच्या मृत्यू प्रकरणी वनविभागाच्या मार्फत शोध घेणे सुरु होते त्यादरम्यान शिव कुमरे यांनी लावलेल्या विद्युत पुरवठा च्या सापळ्यात अटकल्याने बिबट्याचा मृत्यू झाल्याचे चौकशी त लक्षात आल्यावर आरोपीला अटक करण्यात आली असुन वन्य जीव संरक्षण अधिनियम १९७२चे कलम ९,३९,५०व५१,अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला.


सदर गुन्हा चा तपास श्री.राहुल गावई, (भा.व.से.) भंडारा,एस.बी.निलख(प्रकास्ट निस्कासन अधिकारी गडेगाव आगार, यांच्या मार्गदर्शनाखाली श्री.एम.डी.मोहिते (वनपरिक्षेत्र अधिकारी नाकाडोंगरी)हे करित आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button