राज्य

राजमुद्रा ग्रुप तर्फे स्मारक समितीला पुस्तकांचा संच भेट!

तुमसर : शहरात लोकार्पणाच्या प्रतीक्षेत रखडेलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती तथा अत्याधुनिक वाचनालय प्रशासकीय उदासिनतेचे जिवंत उदाहरण ठरले होते. अनेक स्तरावरून पालिकेला त्याबाबत पाठपुरावा देखील करण्यात आलेला होता. शेवटी 20 नोव्हेंबरचे ऑनलाईन मुहूर्त पालिकेला लाभले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे,उप मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस,उप मुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या भंडारा जिल्हा दौऱ्याचे अवचित्य साधून ऑनलाईन पद्धतीने स्मारक समितीच्या भव्य दिव्य वस्तूचे लोकार्पण करण्यात आले आहे. नेमक्या उद्घाटनाच्या दुसऱ्या दिनी राजमुद्रा ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सागर गभने यांचे मार्फत वाचनालयाला पुस्तकां भेट देण्यात आले आहे. सदर उपक्रम राबवून राजमुद्रा वाचनालयकरीता सामाजिक भेट देणारी पाहिली संस्था ठरली आहे. पुस्तकांची भेट स्मारक समितीच्या पदाधकाऱ्यांना करण्यात आले. त्यावेळी स्मारक समिती चे सिद्धार्थ मेश्राम,भारस्कर गजभिये,किशोर भवसागर,ॲड. विलास माटे,जयप्रकाश भवसागर, किशोर भवसागर, ,वाय.एस.देशभ्रतार, राहुल डोगंरे,मुरलीधर वासनिक,निलेश वासनिक,आलोक बंनसोड, किशोर माटे,राजेश काबळे,राजेन वाहाणे,रमा काबळे,चेतन मेश्राम,जय डोगरे,धम॔पाल मेश्राम, रंजनिश बन्सोड, कविता वाहाणे,मनीषा गजभिये,निशा गणविर,शिल्पा रामटेके,रेखा,चदीकापुरे, शुभांगी देशभ्रतार,रिना माटेहे मान्यवर उपस्तिथ होते.

संविधानाची प्रत वाढविणार वाचनालयाचा दर्जा!

– देश चालतो तो संविधानाने, राजमुद्रा ग्रुप तर्फे स्मारक समितीच्या आधुनिक वाचनालयाला संविधानाची प्रत देखील भेट करण्यात आली आहे. त्यामुळे वाचनालयाचा दर्जा नक्कीच वाढणार असे मत संस्थेचे अध्यक्ष सागर गभने यांनी व्यक्त केले आहे.

थोर पुढाऱ्यांची आदर्श जीवन गाथा

  • राजमुद्रा ग्रुपने वाचनालयाला सुपूर्त केलेल्या थोर पुढाऱ्यांच्या संचानमध्ये जीवन चरित्रपर पुस्तकांच्या यादीत छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश आहे. विद्यार्थी यातून आदर्श घेऊन आपल्या संघर्ष पथावरील अडथळे नक्कीच दूर करतील. संच देताना राजमुद्रा ग्रुप चे मिरा भट,आचल मेश्राम, लता सोनी , इंजि.सागर गभने,सागर भुरे,राहुल रणदिवे,योगेश आजापूजे, सुभम बाणासुरे,संकेत गजबीये,अनुप तिडके,स्वपनील डुंबरे, बापु बडवाईक, मनीष बोन्द्रे, दीपक पानसे,अर्पित खानोरकर, यश बडवाईक उपस्तिथ होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button