‘ आधुनिक तंत्रज्ञान’ आणि ‘डिजिटलायझेशन ‘यांचा वापर समर्पकपणे होणे गरजेचे -गृहमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. ८ :- आजच्या काळात ‘डिजिटल लिटरसी’ अत्यंत महत्त्वाची असून व्यापक समाजहितासाठी ‘आधुनिक तंत्रज्ञान’ आणि ‘डिजिटलायझेशन’ यांचा वापर समर्पकपणे होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
सेंटर ऑफ एक्सलन्स डिजिटल अॅकॅडमीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून करण्यात आले.
यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिस इंडियाच्या आरती श्रीवास्तव, आयआय केअर (IICARE) फाऊंडेशनचे डॉ. संतोष भोसले, कॉरपोरेट सोशल ‘रिस्पॉन्सिबिलिटी’चे उपाध्यक्ष अनुराग प्रताप, टी. एन. एस. इंडिया फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालक रूपा बोहरा, कॅपजेमिनी टेक्नॉलॉजी सर्व्हिस इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अश्विनी यार्डी, सिनीअर अॅनालिस्ट सलोनी दिलीप मंत्री, प्रोजेक्ट मॅनेजर सुप्रिया पालांडे, रॉयल कॉलेजचे प्राचार्य डॉ. विवेककुमार पाटील तसेच समीर चिटणीस, सूर्यकांत माळकर यांच्यासह विद्या म्हात्रे, पूनम पाटील यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
डोंबिवलीकर प्रतिष्ठान व टीएनएस इंडिया फाऊंडेशन यांनी कॅपजेमिनी कंपनीच्या सहकार्याने डोंबिवलीत सेंटर ऑफ एक्सलन्स डिजिटल ॲकॅडमी स्थापन करण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, आज जग अतिशय वेगाने बदलत आहे. भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येत आहे. या प्रक्रियेमध्ये ‘डिजिटलायझेशन’ व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत. या गोष्टींच्या आधारावरच आपल्याला आपली गती वाढविता येणार आहे. यामुळे रोजगाराचे क्षेत्रही मोठ्या प्रमाणावर बदलते आहे. या वातावरणात प्रत्येक व्यक्त



