सामाजिक

शिव छत्रपती राज्य क्रिडा पुरस्कार प्राप्त दिव्यांग खेळाडू योगेश्वर घाटबांधेचा महिला नवदुर्गा मंडळाच्या वतीने सत्कार …!

संपुर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

किटाडी: भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील किटाडी येथील दिव्यांग खेळाडू योगेश्वर रविंद्र घाटबांधे यांनी जिल्हा क्रीडा पुरस्कार, दिव्यांग प्रेरणा पुरस्कार व ऑगस्ट-२०२३ मध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळवून संपूर्ण महाराष्ट्रात भंडारा जिल्ह्यासह किटाडी गावाचे नाव लौकिक केल्याबद्दल नवरात्रीचे औचित्य साधून, नवदुर्गा उत्सव मंडपात ‘खून झालाच पाहिजे’ या एकांकिकेच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी, महिला नवदुर्गा मंडळाच्या वतीने मंडळाचे पुजारी रामानंद निपाणे व प्रशांत गोन्नाडे यांच्या पुढाकाराने, सरपंच कल्पेश कुळमते व महिला नवदुर्गा मंडळाच्या अध्यक्षा यशोदा कुंभारे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व रोख रक्कम देऊन योगेश्वरचा यथोचित मान सन्मान देऊन सत्कार करण्यात आला.


याप्रसंगी उपसरपंच पंकज घाटबांधे, पोलीस पाटील प्रशांत धुर्वे, सेवा सहकारी संस्था अध्यक्ष घनश्याम निनावे, ग्रामपंचायत सदस्य रमेश कोहपरे, जीवन चौधरी, अल्पा सलाम, शिल्पा नेवारे, संत केजाजी महाराज देवस्थान समितीचे उपाध्यक्ष केशव कुंभारे, सचिव रामकृष्ण गोन्नाडे यासह नवदुर्गा महिला मंडळाचे सदस्य व गावकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांचे आभार विलास कुंभारे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button