राज्य

भंडारा जिल्ह्यात 7नोव्ह.2023ला शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित होणार!-जिल्हाधिकारी योगेश कुंभेजेकर

भंडारा दि. 27 :  जिल्ह्यात  येत्या 7 नोव्हेंबर 2023 रोजी शासन आपल्या दारी  कार्यक्रम  आयोजित करण्यात येण्याचे प्रस्तावित आहे. या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा म्हणून सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी आज नियोजन सभागृहात घेतली.या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री डॉ.विजयकुमार गावित व अन्य मंत्री उपस्थित राहणार आहेत.

       यावेळी पोलीस अधिक्षक लोहित मतानी, मुख्य कार्यकारी अधिकारी समिर कुर्तकोटी, अति मुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, उपजिल्हाधिकारी श्रीपती मोरे, निवासी उपजिल्हाधिकारी लिना फलके आदी अधिकारी उपस्थित होते.

       या कार्यक्रमाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यवस्था तसेच आयोजनात विविध विभागांची तयारी, तसेच विभागांचा सहभाग व अधिकाऱ्यांची जबाबदारी याविषयी जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button