नागरिकांच्या सहकार्यातुन नव घटित कोंढाळी नगर पंचायतीचा विकास करूधनंजय बोरीकरधनंजय बोरीकर कोंढाळी चे प्रशासकपदभार स्वीकारला

कोंढाळी -वार्ताहर दुर्गा प्रसाद पांडे
नगर पंचायती करिता
बहुप्रतिक्षित कोंढाळी येथे १०-आक्टोबर रोजी काटोल नगर परिषदे चे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी कोंढाळी नगर पंचायतीचे प्रथम प्रशासनीक अधिकारी म्हणून कोंढाळी ग्राम पंचायतीचे ग्राम विकास अधिकारी पी जी लोलुसरे यांचे कडून कार्यालयीन पदभार स्वीकारला.

या प्रसंगी नवनियुक्त प्रशासक म्हणून ग्राम पंचायत व नगर पंचायती चे बाबद माहिती दिली तसेच दोन्ही विभागाचे कामकाजा बाबद माहिती दिली,या प्रसंगी त्यांनी सांगितले की नव घटित कोंढाळी कोंढाळी नगर पंचायतीचे विकासासाठी विकास योजना, नियोजन प्राधिकरणाचे माध्यमातून विकास साधण्यासाठी येथील नागरिकांचे मोलाचे सहकार्याची अपेक्षा आहे. अशी आवाहन मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी केले.
प्रशासकपदी आरूढ
महाराष्ट्र शासन
नगर विकास विभाग
शासननिर्णय क्र एम यु एन -२०१६प्र क्रं/११२/नवि-१८दिनांक-
०९आक्टोबर२०२३
अन्वये महाराष्ट्र नगर परिषदा,नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५च्या(१९६५च्या४०)कलम ३४१अ च्या पोट कलम (१),(१ब)(२) द्वारा प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा व इतर समर्थ करण्यात येणाऱ्या सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने नागपूर जिल्ह्यातील कोंढाळी या ग्राम पंचायतीचे स्थानिक क्षेत्र, ग्रामीण क्षेत्रातून नागरी क्षेत्रात संक्रमित होणारे क्षेत्र हे संक्रमणात्मक क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी उक्त संक्रमणात्मक क्षेत्रासाठी “कोंढाळी नगर पंचायत” घटीत केली आहे.
या पुढे कोंढाळी नगर पंचायतीची रितसर रचना होई पर्यंत कोंढाळी नगर पंचायतीचे अधिकार व कर्तव्ये पार पाडण्यासाठी शासकिय अधिकार्यांची नियुक्ती म्हणून काटोल नगर परिषदेचे मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांची कोंढाळी नगर पंचायतीचे प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
नवीन प्रशासकाने १०आक्टोबर रोजी आपला पदभार सांभाळला आहे.
या प्रसंगी कोंढाळी चे सरपंच केशवराव धुर्वे, उपसरपंच स्वप्निल व्यास सह ग्रा प चे सदस्य, येथील कांग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्षाचे व अन्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांनी मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांचे स्वागत केले.
काटोल नगर परिषद चे माजी अध्यक्ष व काटोल कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती चरणसिंह ठाकूर यांनी नव गटित कोंढाळी नगर पंचायती करिता आजी,माजी नेते,पदाधिकारी यांनी सहकार्य केले याबद्दल सर्वांचे आभार मानले. सरपंच केशवराव धुर्वे उपसरपंच स्वप्निल व्यास ज्येष्ठ सदस्य संजय राऊत, कमलेश गुप्ता, विनोद माकोडे ,भीमराव गोंडाणे, गोपाल माकोडे,हरिदास मडावी,लतिका खोडणकर , सुनिता मलवे, सुनिता गजबे ,बालकिसन पालीवाल, मोहन ठवळे, सुरेंद्र कुर्वे, शामराव तायवाडे, कुणाल भांगे, अन्नू पठाण,एकनाथ पाटील, गोविंद गजबे, वसंतराव बालपांडे, बबलू बिसेन,मोहसीन पठाण, अशपाक काजी,नौशाद पठाण,तसेच नगर पंचायत चे सर्व कर्मचारी यांनी ही सी ओ बोरिकर यांचे स्वागत केले. संचलन व आभार स्वप्निल व्यास यांनी व्यक्त केले.



