राज्य
आमदार बच्छु कडु यांचे १४ऑक्टोम्बर ला भंडारा शहरात आगमन….!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल
भंडारा जिल्हा वार्ता:-
भंडारा शहरात येत्या १४ऑक्टोबर रोजी दुपारी ११वाजे. मान.आमदार तसेच दिव्यांग मंत्रालयाचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) मान.बच्चु कडु यांचे आगमन चैतन्य पोलीस कवायत मैदानावर होत आहे.

ह्या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मान.योगेश कुंभेजेकर, जिल्हाधिकारी भंडारा तसेच मान.लोहित मतानी, पोलीस अधीक्षक भंडारा व जिल्ह्यातील सर्वच विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

हा कार्यक्रम शासकीय असल्याने शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून होत आहे.

मान.बच्चु कडु दिव्यांग बांधवांच्या समस्या जाणुन त्यांचे निराकरण करण्यार करुन मार्गदर्शन करणार आहेत.
ह्या कार्यक्रमाला
भंडारा जिल्हा चे प्रहार दिव्यांग संघटना चे अध्यक्ष मान.रवि मने,सचिव योगेश गाढबांधे, उपाध्यक्ष राजेश ऊके (संपादक), पद्माकर बडगे, पवनी तालुका अध्यक्ष-कहालकर तुमसर तालुका अध्यक्ष-शेषराव गणविर,मोहाळी तालुका अध्यक्ष-पप्पु बोंद्रे हे उपस्थित राहणार आहेत.




