राज्य

बहुजन मराठी पत्रकार संघाच्या भंडारा जिल्हा अध्यक्ष पदी राजेश ऊके तर पुणे शहर अध्यक्ष पदी अकबर शिकलकर यांची निवड

करमाळा :- बहुजन मराठी पत्रकार संघ (रजि.नं. १०७६/२०१०) महाराष्ट्र राज्यव्यापी संघाचे संस्थापक सचिव पंडित राव हणुमंते व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महादेव (आप्पा) लोखंडे यांनी पोलीस की आवाज या न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक मा श्री राजेशजी ऊके यांची भंडारा जिल्हा अध्यक्ष पदी तर जनहक्क टाईम्स न्यूज चॅनेलचे मुख्य संपादक मा श्री अकबर शिकलकर यांची पुणे शहर अध्यक्ष पदी निवड करण्यात आली
पत्रकार बांधवांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी तसेच पत्रकार बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी मा श्री ऊके व शिकलकर कट्टीबद्ध राहतील अशी अपेक्षा संघाचे अध्यक्ष आप्पा लोखंडे यांनी व्यक्त केली यावेळी जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब भिसे सर, सोलापूर जिल्हा सचिव आबासाहेब झिंजाडे, सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा आशाताई चांदणे‌, जिल्हा उपाध्यक्षा श्रीमती प्रमिला जाधव करमाळा तालुका अध्यक्ष प्रमोद खराडे तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब शिंदे,तालुका सचिव प्रदिप पवार, तालुका कार्याध्यक्ष संभाजी शिंदे, करमाळा सदस्य सचिन नवले,माधुरीताई कुंभार तसेच इतर पत्रकार बांधव व भगिनी उपस्थित होते तसेच सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या

भविष्यात एखाद्या पत्रकार बांधव भगिनी वरती अन्याय अत्याचार झाल्यास बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने कडक पाऊले उचलली जातील व बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील – अकबर शिकलकर पुणे शहर अध्यक्ष

भंडारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहील व संघटना वाढीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करणार – राजेश ऊके भंडारा जिल्हा अध्यक्ष

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button