तालुका स्तरावर कबड्डी स्पर्धेत जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नाकाडोंगरी येथील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला!

तुमसर वार्ता:-दि.05/10/2023 रोजी माडगी येथे पार पडलेल्या तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत 17 वर्षांखालील वयोगटात जिल्हा परिषद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नाकाडोंगरी येथील विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर खेळाचे प्रदर्शन करून प्रथम क्रमांक पटकाविला.त्यांची निवड आता जिल्हा स्तरासाठी झालेली आहे.
कबड्डी टीममध्ये शाळेतील नयन राऊत,आर्यन राऊत, भविष्य मस्की, अरमान अगवान, आयुष्य नेवारे, आर्यन गोपाले,कुंदन कापगते, तुषार भूरे,रजत भोंडे, रेहान अगवान इ.विद्यार्थी समाविष्ट होते.

शाळा समिती अध्यक्ष तथा जि.प.सदस्य श्री राजूभाऊ देशभ्रतार,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रमोदजी गोपाले,सरपंच श्री सुमितजी गोपाले, उपसरपंच श्री विजयजी राऊत, मुख्याध्यापक श्री के.एस.इनमुलवार , प्रशिक्षक श्री गोपाल राठोड, जेष्ठ शिक्षक श्री सोनूने सर, व्यवस्थापक श्री आशिष मिश्रा,टीमचे प्रायोजक प्रा.रोशन रामटेके,तुमसर तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कबड्डी टीमला जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्यात.