राज्य

बहुजन मराठी पत्रकार संघ शाखा करमाळा व अंगणवाडी पवार वस्ती कुंभेज यांच्या वतीने स्पर्धा बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न.


करमाळा – बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने घेण्यात आलेल्या गौरी गणपती सजावट स्पर्धा बक्षीस वितरण व एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत पवार वस्ती कुंभेज अंगणवाडी येथे पुरक पोषण महासप्ताह समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. निलेश मोटे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम घेण्यात आला, गौरी गणपती सजावट स्पर्धेत पहिला क्रमांक सौ. नम्रता महेश बारसकर, , दुसरा क्रमांक- सौ. जयश्री यशवंत झिंजाडे, तिसरा क्रमांक- सौ. अक्षदा निलेश माथेसुळ, तर उत्तेजनार्थ सौ.अश्विनी सागर चाकणे ,,सौ. सुवर्णा वसंत मचाले सौ. सुजाता संतोष चौधरी, ज्योती बापूसाहेब शिंदे यांना बहुजन मराठी पत्रकार संघाच्या वतीने बक्षीस देवुन सन्मानित करण्यात आले,, या स्पर्धेत प्रथम ३ क्रमांक आलेल्या सर्व महिलांना यशकल्याणी सेवा भवन संस्थापक अध्यक्ष मा गणेश भाऊ करेपाटील यांच्या कडून पैठणी, मेडल, प्रमाणपत्र, देवुन सन्मानित करण्यात आले, तसेच पाककृती कला स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ. रेणुका ईश्वर भोसले दुसरा क्रमांक सौ. ज्योती अभिजित भोसले, तिसरा क्रमांक. सौ. संगिता रामेश्वर पवार, उत्तेजनार्थ सौ. स्वाती बिभीषण शिंदे तसेच यावेळी संगीत खुर्ची स्पर्धेत प्रथम क्रमांक सौ वैष्णवी महावीर भोसले, या सर्व महिलांना अंगणवाडी च्या वतीने सर्व मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देवुन सन्मानित करण्यात आले,

या कार्यक्रमात डॉ मोटे यांनी महिलांना आरोग्य विषयक माहिती तसेच अंगणवाडी चे कार्य खूप कौतुकास्पद आहे असे म्हटले, अाई नंतर मुलांची पहली गुरु म्हणजे अंगणवाडी ताई असते अशा अनेक उदाहरणे देऊन त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेसाठी, आरोग्य साठी महत्त्वाचे मार्गदर्शन केले, त्यानंतर पुरक पोषण आहार या विषयावर बालविकास प्रकल्प पर्यवेक्षीका आतकर मॅडम यांनी महिलांना खूप छान माहिती दिलीऐ, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. बाळासाहेब भिसे सर यांनी केले तर आभार सौ. आशाताई चांदणे यांनी मानले,

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. उबाळे सर, झिंजाडे सर, तात्यासाहेब मिसाळ , सोमनाथ मुटके, रामेश्वर पवार, सागर पवार, हारुण पठाण, रुषीकेश शिंदे, यांनी अधिक परिश्रम घेतले, या वेळी उपस्थित मान्यवर डॉ श्री. निलेश मोटे, सौ. ज्योती निलेश मोटे, मा. आतकर मॅडम, सिंधुताई गायकवाड, श्री. गुरुदास सुर्वे, नितिन भोसले, सौदागर सुर्वे, भारत पवार, बिभीषण पवार,श्री महावीर भोसले,शाळेतील मुख्याध्यापक श्री. उबाळे सर, तसेच बहुजन मराठी पत्रकार संघाचे श्री.बाळासाहेब भिसे सर, श्री. आबासाहेब झिंजाडे, प्रमोद खराडे, प्रमिला जाधव, श्री. संभाजी शिंदे, सौ. माधुरी कुंभार, अंगणवाडी सेविका सौ. आशाताई चांदणे अंगणवाडी मदतनीस मंगल शिंदे या कार्यक्रमास उपस्थित , जेऊर १ व २ मधील सर्व अंगणवाडी सेविका, शाळेतील विद्यार्थी आणि वस्ती वरिल महिला व पालक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य केले व कार्यक्रम
यशस्वी पध्दतीने संपन्न झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button