राज्य
बहुजन मराठी पत्रकार संघाच्या जिल्हा अध्यक्ष पदी राजेश ऊके यांची निवड…!

प्रमिला जाधव सहसंपादक पोलीस कि आवाज न्युज
करमाळा वार्ता:- बहुजन मराठी पत्रकार संघ रजि.नं. १०७६/२०१० ह्या संघाचे अध्यक्ष महादेव (आप्पा) लोखंडे संस्थापक सचिव पंडित राव हनुमते यांनी भंडारा जिल्ह्यातील राजेश नारायण ऊके यांना भंडारा जिल्ह्याचे बहुजन मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली.
श्रीयुत राजेश ऊके यांनी प्रमिला ताई जाधव (सहसंपादक) पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क व महादेव (आप्पा )व संस्थापक सचिव पंडितराव हनुमते यांचे हार्दिक आभार मानले.


नियुक्ती बद्दल मान.दुर्गाप्रसाद पांडे (सहसंपादक पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क), रामलाल रगेर (राजस्थान),समिर पटेल (प्रचारक मुंबई)व श्रीयुत कानुनी सलाहगार माटे (वकील) यांनी आभार मानले.

राजेश ऊके यांनी आपल्या नियुक्ती बद्दल सांगितले की भंडारा जिल्ह्यातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहतील व संघटनेत जास्तीत जास्त सभाषद सामील होऊन संघटना बळकट करतील.



