भाई नितीन काळे यांना सर्वांनी मिळून ताकद देऊयात-माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे

पंढरपूर( संजीव भांबोरे) नितीन काळे यांच्या 24 व्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथे भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सत्कार सोहळ्याला प्रमुख उपस्थिती म्हणून माजी मंत्री आणि नुकतीच ज्यांची भारतीय जनता पार्टी प्रदेश प्रवक्ते पदि निवड झालेले प्रा. लक्ष्मणराव ढोबळे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातुन अनेक मान्यवर दिवसभर भाई नितीन काळे यांना शुभेच्छा देण्यासाठी येत होती अनेक जणांनी राजकीय पक्ष बाजुला ठेवून भाई नितीन काळे यांच्या कार्याचे कौतुक करत होते .कमी वयात यशस्वी होत असलेला हा तरूण नेतृत्व आज सर्वांच्या मदतीला धावून जात आहे .आम्ही जेंव्हा जेंव्हा नितीन काळेंना हाक मारेल तेंव्हा ते धावुन येतात असे उद्गार आम आदमी पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष एम बाबा पाटील यांनी काढले. तसेच प्रा लक्ष्मणराव ढोबळे यांनीही शुभेच्छा देताना सांगितले की, नितीन काळे यांच्यामध्ये सामाजिक ,राजकीय काम करण्याची त्यांना आवड आहे एक धाडसी उमदे नेतृत्व आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा ओबीसी समाजातील सर्वात जवळचा तरुण व्यक्ती जर कोण असेल तर ते नितीन काळे आहेत त्यांना येणाऱ्या काळात सर्वांनी मिळून साथ देऊयात ताकद देऊयात असेही प्रा लक्ष्मणराव ढोबळे सर यांनी सांगितले.. वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वच क्षेत्रातील मान्यवर सकाळी अकरा वाजल्यापासून ते सायंकाळी दहा पर्यंत शुभेच्छा देण्यासाठी येत होती त्यांनी दिलेली साथ मोलाचे मार्गदर्शन कमी वयात माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीतुन आलोय पण मी माझ्या जीवनात माणुसकी कमवली आहे माझ्याकडे एखादा व्यक्ती काम घेऊन आलाय आणि ते काम मी केले नाही असे कदापि झाले नाही अडचणीच्या काळात दिलेली साथ मी कधीच विसरू शकत नाही तुम्ही सर्वजण मला साथ देताय पुढे जाण्यास सहकार्य करताय म्हणून तरी मी आज समाजकारणात राजकारणात सक्रिय आहे असे नितीन काळे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले . विशेष म्हणजे प्रा लक्ष्मणराव ढोबळे सर यांचे कार्य हे खुप मोठे आहे त्यांनी माझ्या सारख्या तरूण युवकाला नेहमीच पुढे जाण्यासाठी मोलाची मदत मार्गदर्शन केले त्यामुळेच मी आज सर्वांचे प्रामुख्याने प्रश्न सोडवित आहे असेही नितीन काळे यांनी सांगितले. विशेष म्हणजे भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील शुभेच्छा पत्र पाठवून शुभेच्छा दिल्या आहेत त्यांनी दिलेल्या संधीचे मी सोने करेल आज माझ्यावर भारतीय जनता पक्ष पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष भ वि आघाडी म्हणून जबाबदारी आहे ही जबाबदारी मला भारतीय जनता पक्षाचे भ वि आघाडी प्रदेश अध्यक्ष नरेंद्र दादा पवार यांच्या मुळे मिळाली आहे नक्कीच येणाऱ्या काळात पक्षासाठी पुर्णवेळ काम करील करत आहे असेही नितीन काळे यांनी सांगितले आज माझ्या वाढदिवसानिमित्त अनेक आमदार खासदार मंत्री तसेच सामाजिक ,राजकीय अधिकारी यांच्याकडून मला शुभेच्छा मिळाल्या आहेत. सर्वांनी सकारात्मक ताकद दिली आहे नितीन तुझे कार्य चांगले आहे असेच सर्वजण शुभेच्छा देताना सांगत होते . त्यांनी सर्वांचे सर्वांचेच आभार मानले. या कार्यक्रमासाठी प्रामुख्याने उपस्थिती म्हणून माजी मंत्री भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे ,सांगोला तालुक्याचे युवा नेते डॉ बाबासाहेब देशमुख ,चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भारत नाना कोळेकर ,नगरसेवक डि राज सर्वगोड नगरसेवक, आदित्य फत्तेपूरकर ,परमेश्वर कोळेकर ,रासपचे पंकज देवकते सोमनाथ ढोणे शिवाजी घाडगे, धनाजी बनसोडे ,प्रा विजयकुमार वाघमोडे, अनिल ननवरे सर, आम आदमी पक्षाचे एम बाबा पाटील, बंडु मोरे ,राजाभाऊ भोसले, रासपचे संजय लवटे सर, रविराज मेटकरी अॅड ,दत्तात्रय खडतरे ,सोहम कांबळे ,चैतन्य घाडगे ,आदम बागवान ,राजाभाऊ उराडे तसेच सर्वच क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



