दाभा वळण ते माडगी राज्य मार्ग नूतनीकरनाच्या मागणीसाठी युवक काँग्रेसचा रास्ता रोको आंदोलन

*सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला १ महिन्यात काम सुरू करण्याचे लेखी पत्र*
पवन वंजारी यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनाला मोठा यश
भंडारा जिल्हा वार्ता –

दाभा वळण ते माडगी राज्यमार्ग मोठया प्रमाणात खड्डेमय ( खराब) झालेला आहे. हा रस्ता दोन जिल्हयांना जोडणारा असून ग्रामीण भागातील महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्याने शेतकरी, मजूर, विद्यार्थी, नौकरदार वर्ग व जिल्हयाच्या ठिकाणी कामानिमीत्त शेकडो लोक प्रवास करतात. मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता मोठया प्रमाणात खराब झालेला असून, अनेक लोकांना अपघाताला सामोरे जावे लागले. अनेक लोकांना कायमचा अपंगत्व, तर काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
अनेक सामाजीक संघटनेच्या वतीने व राजकिय पक्षाच्या वतीने निवेदने देण्यात आलेले आहेत. परंतु
अद्यापही कुठलीही कारवाही या रस्त्यांबाबत झालेली नव्हती.
त्यामुळे आज भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांच्या नेतृत्वात दाभा वळण या ठिकाणी भंडारा – तुमसर राष्ट्रीय महामार्ग बंद करून आंदोलन करण्यात आले.यावेळी आंदोलनाची त्वरित दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने आठ दिवसात रस्त्यातील खड्डे भरण्याचे व एक महिन्यात रस्ता नूतनीकरणाच्या कामाला सुरुवात करण्याचे कार्यालयीन पत्र कार्यकारी अभियंता पराग ठमके यांनी आज आंदोलनकर्त्यांना दिला.
यावेळी बालू ठवकर,पंकज उके, विनीत देशपांडे, आकाश ठवकर, मुलचंद ईश्र्वरकर, शेखर ईश्र्वरकर,राधे भोंगाडे,रोहित खंडाईत, इर्शाद खान,अनिल ईश्र्वरकर,मनोज ईश्र्वरकर,सोहेल शेख,आकाश चोपकर,राहुल ईश्र्वरकर,माधव साकुरे,दामोधर चोपकर,महेश शेंडे,रोशन बंसोड,विजय आस्वले,गंगाराम खोकले, गौरीशंकर शेंडे,विक्रम बोंदरे, व अनेक आंदोलनकर्ते यावेळी उपस्थित होते.
