आरोग्य

मुकुंद जोशी जिल्हा सामान्य रुग्णालयाचा कर्मचारी की अधिकारी?

????बसुन राहुन माहिती काढून करतो ब्लकमेलींग धंदा?

???? कंत्राट मिळाले नाही म्हणून रचले बदनामी करण्याचे षडयंत्र.

नागपूर / प्रतिनिधी दि. ६ /९/२०२३:- गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्ह्यासह अन्य सीमेलगतच्या राज्यातील रुग्ण उपचारासाठी दाखल होतात. कोविड काळात जिल्हा सामान्य रुग्णालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी संजय मिणा यांच्या मार्गदर्शनाखाली स्वताच्या जिवाची पर्वा न करता, अहोरात्र परिश्रम करून रुग्णांना उत्कृष्ट सेवा दिली. तरीही काही ब्लॅकमेलरांनी आरोग्य प्रशासनाला बदनाम करण्यासाठी अनेक डावपेच रचले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. तशी तक्रार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली यांना पाठविण्यात आली आहे. प्राप्त झालेल्या तक्रारींनुसार सविस्तर वृत्त असे की, गडचिरोली येथील मुकुंद जोशी हे स्वच्छता सेवा आणि मनुष्यबळाच्या कंत्राटात सामिल होत होते. परंतु मागील काही वर्षांत जिल्हा सामान्य रुग्णालयात अटी आणि नियमानुसार काम मिळाले नसल्याने पिसाळलेल्या मुकुंद जोशी यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनावर हेतू पुरस्सर , बदनाम करण्यासाठी, सूडबुद्धीने वारंवार डाव रचल्याचे दिसून येते. याबाबत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक गडचिरोली यांच्याकडेही माहिती देण्यात आली असल्याचे विश्वसनीय वृत हाती आले आहे.


प्राप्त झालेल्या विश्वसनीय माहिती नुसार सविस्तर वृत्त असे की. मुकुंद जोशी हे एका साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक म्हणून काम करित आहेत. तरीही त्यांना आतापर्यंत ब्लकमेलींगच्या कामात बरिच प्रसिद्धी मिळाली आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेल्या अनेक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना ब्लकमेलींग करण्यासाठी माहिती अधिकाराचा दुरुपयोग केल्याची खमंग चर्चा सुरू आहे. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या विरोधात अनेक प्रकारचे खोटे आरोप करून त्यांना विनाकारण बदनाम करण्यासाठी अनेकदा षडयंत्र रचले असल्याचे प्राप्त माहिती वरुन स्पष्ट होते. पत्रकार स्वयंसहायता बचत गट ही संस्था स्वत:च्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या नावाने चालवून आजपर्यंत मुकुंद जोशी यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केलेला आहे. आजपावेतो घेतलेल्या मनुष्यबळाचा, अन्न धान्य पुरवठा करण्याच्या, कामावरील कामगारांचा पि एफ सुद्धा दिलेले नाही. २०१९ – २० या वर्षात स्वयंसहाय्यता बचत गट या संस्थेच्या नावाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत बाह्यस्त्रोताद्वारे मनुष्यबळ पुरवठा करण्याचा करोडो रुपयांचा कंत्राट मिळविला होता . त्याकामी घेतलेल्या कामगारांचे पगार आणि पी. एफ दिले नाही. याबाबतची तक्रार जिल्हाधिकारी गडचिरोली यांचेकडे केली होती. तसे वृत्तही प्रकाशित झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button