राजकीय
दाभा मोड ते माडगी राज्य मार्ग त्वरित नुतनीकरण (दुरुस्ती)करा-पवन वंजारी
महाराष्ट्र राज्यात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क

दाभा मोड ते माडगी राज्यमार्ग मोठया प्रमाणात खड्डेमय ( खराब) झालेला आहे. हा रस्ता दोन जिल्हयांना जोडणारा असून ग्रामीण भागातील अतिमहत्वाचा रस्ता आहे. या रस्तयाने शेतकरी, मजूर, विद्यार्थी, नौकरदार वर्ग व जिल्हयाच्या ठिकाणी कामानिमीत्त शेकडो लोक प्रवास करतात. मागील अनेक वर्षांपासून हा रस्ता मोठया प्रमाणात खराब झालेला असून, अनेक लोकांना अपघाताला सामोरे जावे लागले. अनेक लोकांना कायमचा अपंगत्व, तर काही लोकांना आपले प्राण गमवावे लागले.
अनेक सामाजीक संघटनेच्या वतीने व राजकिय पक्षाच्या वतीने निवेदने देण्यात आलेले आहेत. परंतु
दअदयापही कुठलीही कारवाही या रस्त्यांबाबत झालेली नाही.१० सप्टेंबर २०२३ पर्यंत या रस्त्याचे नविनीकरण करण्यात यावे.
अन्यथा ११ सप्टेंबर २०२३ रोजी दाभा मोड दाभा या ठिकाणी भंडारा जिल्हा युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून तीव्र आंदोलन करण्यात येईल व याला सर्वस्वी जबाबदारी आपल्या प्रशासनाची राहील.
या आशयाचा निदेवन आज भंडारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष पवन वंजारी यांच्या नेतृत्वात इंजी.पराग ठमके,कार्यकारी अभियंता,सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन यांना देण्यात आले.यावेळी भंडारा जिल्हा काँग्रेसचे सचिव विनीत देशपांडे,भंडारा तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सुनील सुखदेवे उपस्थित होते.
