क्राइम

खरबी गावात टिप्पर च्या धडकेत पती -पत्नी चा जागीच मृत्यू

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा

पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल

भंडारा जिल्हा वार्ता:- मिळालेल्या माहितीनुसार मोहाळी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खरबी येथे कोळसा भरुन नेत असलेल्या टीप्परने रस्त्याच्या कडेला उभे असलेले मोटरसायकल सायकल लगत पती-पत्नी ला जोरदार धडक दिल्याने मृत्यू पावले तर एक महिला गंभीर जखमी झाले.
सविस्तर वृत्त असे की तिरोडा येथे अदानी पावर प्लांन्ट मध्ये कोळसा भरुन नेत असलेल्या टीप्परने रस्त्याच्या कडेला मोटरसायकल धरुन उभे असलेले बालचंद ढोंबरे वरठी व त्यांची पत्नी अनीता ढोबरे यांचा जागीच मृत्यू झाला तर नलुबाई बडवाईक यांना गंभीर दुखापती होऊन जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.


बालचंद ढोंबरे हे रेल्वेत कार्यरत होते ढोंबरे परिवार देवदर्शनाहुन परत आल्यानंतर नातेवाईकांना सोडण्यासाठी खरबी गावाला आले होते.
तुमसर – भंडारा राष्ट्रीय महामार्ग असुन ह्या रस्त्यावरून जड वाहने खुप प्रमाणात ये-जा करतात परंतु रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे असल्याने ते खंड्डे मृत्यू ला आमंत्रण देत असतात . खड्डे बुजविण्यासाठी लाखो रुपयांचा कंट्राक काढून कंट्राकदार खड्डे वर-वर बुजवुन लाखो रुपयांचा घोळ करतात तरिपण सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने चित्र दिसुन येत आहे.


भरगाव वेगाने धावणाऱ्या वाहतूक दारावर नियंत्रण वाहतूक नियंत्रण शाखा व हायवे नियंत्रण वाहतूक शाखा ने बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे.
ह्या अपघातात मोहाळी पोलीस स्टेशन येथे अप.क्र १७९/२०२३ कलम २७८,३०४,(अ)३३७भा.द.वि.सहकलम १८४गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास मान.लोहित मतानी (पोलीस अधीक्षक भंडारा),ईश्वर कातकडे (अपर पोलीस अधीक्षक),मान.अशोक बागुल (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदिप पुल्लरवार (पोलीस निरीक्षक मोहाळी)व त्यांचे सहकारी पोहवा.भोंगाडे,एनपीसी हुकरे, लांडगे व पोहवा बडवाईक करित आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button