आरोग्य
भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात विविध पदे रिक्त असल्याने आरोग्य व्यवस्थेत अस्थिरता !


संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदा
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल
भंडारा जिल्हा वार्ता -भंडारा जिल्ह्यातील नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक पदे रिक्त असुन प्रभारी आरोग्य अधिकाऱ्यांवर रुग्णालय चालत आहे.ईथे दोन आरोग्य अधिकाऱ्यांची पदे असुन दोन्ही पदे रिक्त असुन प्रभारी आरोग्य अधिकारी कामकाज पहात आहेत.
स्वास्थ्य सेविका ४ पद , स्वास्थ्य सेवक ४ पद,परिचर ३पद,सफाई कामगार १पद, स्वास्थ्य सहाय्यक १पद असे अनेक पद रिक्त आहेत.
नाकाडोगरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सात उपकेंद्र असुन काही उपकेंद्रात सीएचओ पद रिक्त आहेत.ह्या सर्व माहिती लक्षात घेता
जिल्हा परिषद भंडारा आरोग्य विभागाने
लक्ष देऊन रिक्त पदे भरण्यात यावे जेनेकरुन सामान्य जनतेची समुचित स्वास्थ्य व्यवस्था सुरळीत होईल.

