भंडारा पोलीस स्टेशन ची कामगिरी -युवकाची हत्या करणाऱ्या आरोपी ला १२ तासात पोलीसांच्या ताब्यात!

संपूर्ण महाराष्ट्रात सर्वांत जास्त पसंतीदआ
पोलीस कि आवाज न्युज नेटवर्क/चॅनल
भंडारा जिल्हा वार्ता:-मिळालेल्या माहितीनुसार भंडारा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या राह.मेंढा तालुका -लाखनी जि.भंडारा येथील रहिवासी असुन मृत्युक अभिषेक सावन कटकवार याची निघृणपणे हत्या करणाऱ्या पाच आरोपींना अवघ्या १२ तासात भंडारा पोलीसांनी अटक केली असून २पसार आरोपीचा शोध घेत आहेत.
सविस्तर वृत्त असे की मृतकाच्या पत्नी आणि सासु यांना आरोपी चिराग गजभिये याने मोबाईल फोन द्वारे मॅसेज केल्यामुळे काही दिवसांपूर्वी मृत्यकाने आरोपी ला बजावुन सांगितले त्यांचा तोंडी वादविवाद झाला होता.

त्यानंतर दिनांक २१/०८/२०२३ला ११ते ११.३०दरम्यान मृतक व त्याचा लहान भाऊ रस्त्याने जात असताना आदिच्या भांडणाच्या कारणावरून सर्व आरोपीने एकत्र येऊन मृतकास अश्लील शिवीगाळ करून नाली वरील सिमेंट चे दगळ आणि विटाने मृतकाच्या डोक्यावर मारहाण करून तसेच मृतकाच्या *हनुवटी खाली व पोटावर चाकुने गंभीर घाव घालून मृतकाचा खुन केल्याचे त्याच्या भावाच्या तोंडी तक्रारीवरून पोलीस स्टेशन भंडारा येथे एकुण ७आरोपी विरुद्ध अप.क्र.५६५/२०२३कलम ३०२,१४३,१४६,१४७,१४८,१५९,२९४भादवी.सहकलम ४/२५भारतीय हत्यार कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
अटक आरोपी १,)चिराज गजभिये,२)पराग सुखदेवे,३)लुकेश जोध,४)शाम ऊके ५) सागर भुरे आणि पसार आरोपी १)मोण्या शेंडे २) मुकेश घोडीचोर.
पुढील तपास
. मा.लोहित मतानी (पोलीस अधीक्षक), ईश्वर कातकडे (अपर पोलीस अधीक्षक), डॉ.अशोक बागुल (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोकुळ सुर्यवंशी,
सपोनि विनोद गिरी,सपोनि अशोक जाईभाई,पोउपनी मंगेश कराडे,पोहवा.वाघमारे पोलीस स्टेशन भंडारा करित आहेत.



